Sanjay Raut letter To Amit Shah : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधक या मुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याच बरोबर खासदार राऊत यांनी या पत्रात देशाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षितेबद्दल आणि आरोग्याबाबत माहिती देण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
संजय राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मी आपल्याला हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंतेच्या परिस्थितीत लिहित आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षितेबद्दल आणि आरोग्याबदल गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरत आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण चिंतीत आहोत. 21 जूलै रोजी संसदेच्या कामकाजादरम्यान राज्यसभेचे कामकाज अचानक थांबवण्यात आले. यामागचे कारण सभापतींच्या प्रकृती अस्वास्थ्याचे असल्याचे सांगण्यात आले होते. ही एक सामन्य घटना आहे मात्र त्यानंतर घडलेल्या काही गोष्टी अधिक धक्कादायक आणि चिंताजनक आहेत. असं खासदार राऊत यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Hon.Home Minister
Shri @AmitShah ji
Jay hind! pic.twitter.com/uxAgRKPUKk— Sanjay Raut (@rautsanjay61) August 11, 2025
‘अरण्य’ मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी; लक्षवेधक मोशन पोस्टर प्रदर्शित
तर दुसरीकडे यापूर्वी देखील खासदार राऊत यांनी जगदीप धनखड यांच्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनाम्या दिल्यानंतर ते सध्या कुठे गायब आहे. धनखडांचे काय झाले? असं प्रश्न विचारात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच विरोधकांना गायब करण्याची परंपरा चीन आणि रशियामध्ये आहे. असं देखील खासदार राऊत म्हणाले.