मुंबई : शरद पवारांचा खास शिलेदाराच्या मध्यस्थिने उद्योगपती गौतम अदानींच्या (Gautam Adani) घरी शरद पवारांचा खास शिलेदार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बैठक पार पडली. यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या सर्व चर्चांमध्ये मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मविआला बेचिराख करण्याचा भाजपचा मास्टर प्लॅनचं फोडून टाकला आहे. राज्यात महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावरून राऊतांनी भाजपला घेरले आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षातील खासदार फोडण्यासाठी अजित पवार यांच्यापुढे काय प्रलोभन ठेवले त्यासंदर्भातील गौप्यस्फोटही राऊतांनी केले आहेत. (Sanjay Raut On Gautam Adani Meeting)
‘2022 मध्ये CM झालो असतो तर, कदाचित…’; मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान
खासदार फोडण्यासाठी अजितदादांना खास ऑफर
शरद पवार यांच्या गटातील खासदार अजित पवार यांच्या गटात जाऊ शकतात का? यावर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार भाजपा विचारा सोबत जातील असं मला वाटत नाही. मात्र, भाजपाने प्रफुल पटेल, अजित पवार यांना सांगितले आहे की, पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या म्हणजे तुमचे सहा खासदार होतील. त्यानंतर तुम्हाला मंत्रिपद देऊ अशी ऑफर अजितदादांना भाजपकडून देण्यात आल्याचा दावा राऊतांनी केला आहे. मी शरद पवार यांना ओळखतो जवळजवळ मी रोजच असतो त्यांच्यासोबत, संसदेत राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा बाजू-बाजूलाच आहे. धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार यशवंतराव चव्हाणांपासून या महाराष्ट्रात बिंबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील असं मला वाटत नाही.
‘वन नेशन वन इलेक्शन’चा कायदा करण्याचा अधिकार संसदेला नाही; आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं…
गौतम अदाणींकडून महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न
सुरू असलेल्या सर्व घडामोडींमध्ये ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यात मध्यस्थी करत आहेत. त्यांच्या घरी सध्या राजकीय चर्चा होत असून, महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्याचे भवितव्य घडवण्यासाठी अदानी काय दादा धर्माधिकारी, विनोबा भावे किंवा यशवंतराव चव्हाण आहेत का ? असा सवालही राऊतांनी यावेळी उपस्थित केला. एक उद्योगपती नरेंद्र मोदींचा मित्र आहे तो महाराष्ट्रात राजकारण करणार महाराष्ट्राचा भवितव्य ठरविणार आणि हे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसले आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजेत स्वतःला मराठी म्हणून घ्यायला अशी संतापजनक प्रतिक्रियाही राऊतांनी व्यक्त केली.
लोकसभेत काहीतरी मोठं घडणार, भाजप- काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी
ऑन महाविकास आघाडी अस्वस्थता
भाजपकडे सत्ता आहे त्यांच्याकडे काळा पैसा आहे. त्यांच्याकडे पोलीस, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत त्यामुळे अशा प्रकारचे दावे ते करू शकतात. या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही 15 मिनिटात खाली केला असता असे राऊत म्हणाले. एवढेच नव्हे तर, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा. निवडणुकांची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून जातील असेही ते म्हणाले. तसेच आम्ही तुरुंगवास भोगले. रक्त सांडलं आता आम्ही सभ्य झालो आहोत. आम्हाला पुन्हा आवाहन देऊ नका असा इशाराही राऊतांनी दिला आहे.