गौतम अदानी अन् पवारांची भेट कशी झाली? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

गौतम अदानी अन् पवारांची भेट कशी झाली? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी नुकतीच अहमदाबाद येथे उद्योगपती गौतम अदानी Gautam Adani यांची भेट घेतली. त्यावरुन शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावरुन जोरदार टीका सुरु आहे. त्यावरुन पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी अहमदाबाद येथे गेलो होतो. तिथे बारामती(Baramati) येथील उद्योजकाने एक कंपनी काढली आहे. या उद्योजकांच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. तेथे त्या उद्योजकाने उद्योगपती गौतम अदानी यांना देखील बोलावलं होतं, त्यावेळी त्यांच्याशी भेट झाली.

महिला आरक्षणाचे निर्णय काँग्रेस सरकारनेच घेतले, हे पंतप्रधानांना माहिती दिसत नाही; पवारांचा टोला

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला आरक्षण, कांदा प्रश्नासह विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. शरद पवार म्हणाले की, बारामतीमधील त्या उद्योजकाने एक अनोखा प्रकल्प त्या ठिकाणी उभारला आहे. त्या ठिकाणी मला या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी बोलावले होते. त्याचबरोबर उद्योजक गौतम अदानी यांना देखील बोलावले होते. त्यामुळे मी त्या कार्यक्रमासाठी आनंदाने गेलो असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

India Canada Row : पार्किंजवळच अडवलं अन् अंदाधुंद फायरिंग; निज्जरच्या हत्येचा थरार वाचा !

त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाबाबत विधान केलं की, काँग्रेस व काही पक्षांनी नाइलाजास्तव महिला आरक्षणाला पाठिंबा दिला. हे विधान अतिशय खेदजनक आहे. कारण सर्वांनी या निर्णयाला एकमताना पाठिंबा दिला असताना असं बोलणं योग्य नाही. तसेच महिला आरक्षणामध्ये महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाना 33 टक्के आरक्षण दिलं. त्याचबरोबर मी संरक्षणमंत्री असताना नेव्ही एअरफोर्स आणि आर्मीमध्ये महिलांना 11 टक्के आरक्षण दिलं आहे.

महाराष्ट्रात जेव्हा महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात आलं. त्यावेळी मीच महारष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्याचबरोबर जेव्हा नेव्ही एअरफोर्स आणि आर्मीमध्ये महिलांना 11 टक्के आरक्षण दिलं तेव्हा त्या निर्णयाला विरोध देखील झाला होता. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे देशात महिला आरक्षणबाबत जे महत्त्वाचे निर्णय झाले त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत होते. याची माहिती पंतप्रधान मिळालेली दिसत नाही, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावणे हे अन्यायकारक आहे. केवळ भारतात नाही. तर याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे परिणाम होतात. कांदा निर्यातीमध्ये भारतचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेतली तर सतत कांदा खरेदी बंद पडणे, निर्यात बंद करणे, एक्सपोर्ट ड्युटी वाढवणे या सातत्याच्या भूमिकेमुळे आपल्या देशात सातत्य नाही. ही प्रतिमा जगभरात तयार होते. ती घातक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube