Download App

राज्यसभा सभापती धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव का आणला?, राऊतांनी दिलं उत्तर

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे गेल्या काही दिवसांपासून पक्षपातीपणे वागत असल्याचं दिसतं आहे. सभापती जगदीप धनकर

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Jagdeep Dhankhar : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव राज्यसभा सचिवालयाकडे सादर करण्यात आला आहे. (Sanjay Raut ) जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे गेल्या काही दिवसांपासून पक्षपातीपणे वागत असल्याचं दिसतं आहे. सभापती जगदीप धनखड हे सत्ताधारी पक्षाच्या बाजून झुकलेले आहेत आणि विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमच्यासमोर अविश्वास प्रस्ताव सादर करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Video: आपकी टोन ठीक नही खासदार जया बच्चन यांचा आरोप; राज्यसभा सभापती जोरदार भडकले

राज्यसभेच्या नियमानुसार उपराष्ट्रपती म्हणजेच सभापतींना त्यांच्या पदावरून हटविण्यासाठी आधी अविश्वास प्रस्ताव सभागृहात मंजूर व्हावा लागतो आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करता येते. राज्यसभेचे कामकाज चालवताना धनखड यांच्या कथित पक्षपाती वागणुकीवरून विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला आहे. विशेषतः काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

विरोधी पक्षीय खासदारांना मुद्दे मांडण्याची परवानगी देणे तर दूरच, त्यांची मतेही धनखड कामकाजातून काढून टाकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. दैनंदिन कामकाजाबाबतही विरोधक सभापतींवर सातत्याने पक्षपातीपणाचा आरोप करीत आहेत. याबाबतच्या प्रस्तावची नोटीस विरोधकांनी राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांच्याकडे मंगळवारी दिली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी असा प्रस्ताव आणणे आवश्यक बनल्याचे सांगितले. प्रस्तावासाठी ५० सदस्यांच्या सह्या आवश्यक असल्या तरी आमच्याकडे ७० सदस्यांच्या सह्या आहेत, असे काँग्रेसने सांगितले.

follow us