Download App

जम्मूत गुंजणार ‘जय महाराष्ट्र’! CM शिंदेंच्या प्रयत्नांना यश, मुंबईत पोहचण्यापूर्वीच मिळाली जमीन

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना अवघ्या काही तासातचं यश आलं असून आता जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सरहद’ या पुणेस्थित स्वयंसेवी संस्थेचे समन्वयक झाहिद भट यांनी त्यांची बडगामधील जमीन महाराष्ट्र भवनसाठी देण्याची तयारी दाखविली आहे. याबाबत आपलं मुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही बोलणं झालं असल्याचं या संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले. (Coordinator of Sarhad Zahid Bhat has expressed his readiness to donate his land for Maharashtra Bhavan)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जम्मू-काश्मीर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि जम्मू-काश्मीमध्ये ‘महाराष्ट्र भवन’साठी श्रीनगरमध्ये जमीन देण्याची विनंती केली. यानंतर काही तासांतच झाहिद भट यांनी त्यांची जमीन देण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसंच महाराष्ट्र भवन उभं राहिल्यास  इथले व्यवस्थापन काश्मिरी मुस्लिमांनी करावे, त्यामुळे या प्रदेशातील समृद्ध विविधता दिसून येईल. सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली.

कृषी विभागाच्या कथित धाडी प्रकरणी अब्दुल सत्तारांचा पाय खोलात जाणार?

सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि समन्वयक झाहिद भट यांनी संयुक्तपणे काढलेल्या पत्रकामध्ये म्हंटले की, सरहद स्वयंसेवी संस्था गेल्या 30 वर्षांपासून भारताच्या सीमा ओलांडून एकोपा वाढवण्यासाठी आणि लोक-लोकांचे संबंध दृढ होण्यासाठी काम करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनासाठीचा प्रस्ताव हा “महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीरमधील संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हणतं सरहदने मुख्यमंत्री शिंदे यांच्या दूरदर्शी भूमिकेचे कौतुकही केले.

सरहदकडून पुण्यात जम्मू-काश्मीर भवनसाठी जमिनीची मागणी :

दरम्यान, सरहदने पुण्यात ‘जम्मू-कश्मीर भवन’साठी महाराष्ट्र सरकारकडे जमिनीची मागणी केली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षांपासून आम्ही सरकारकडे भवनसाठी जमिनीची मागणी करत आहोत. पुण्यात जम्मू-कश्मीर भवन झाल्यास या सुविधेचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल, त्यांना महाराष्ट्रात शैक्षणिक संधी उपलब्ध होतील. पुण्यात जम्मू आणि काश्मीर भवनाची स्थापना झाल्यास जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रचे बंध अधिक दृढ होतील, हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी आम्ही सरहद सरकारसोबत हातमिळवणी करून काम करण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे.

लबाड लांडगं ढोंग करतंय, गतिमान सरकार… राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

35,000 चौरस फूट जमीन दान देण्याचा प्रस्ताव :

सरहदने “महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी 35,000 चौरस फूट जमीन दान देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला दिला आहे. एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना नहार म्हणाले, बडगाम रेल्वे स्थानकापासून आणि विमानतळापासून जमीन फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही आमच्या मंडळाच्या सदस्यांशी आणि विश्वस्तांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने सरहदचा प्रस्ताव स्विकारल्यास जम्मू-काश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन उभे राहण्यासाठी मदत होणार आहे.

Tags

follow us