MS Dhoni Retirement : आयपीएल 2027 साठी चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनीची मेंटॉर पदी निवृत्ती केल्याने धोनी आता खेळताना दिसणार नाही. धोनीने अचानक निवृत्ती घेतल्याने सीएसकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता धोनी शेअर बाजारात धमाका करण्याची तयारी करत आहे. धोनीने गुंतवणूक केलेल्या ‘गरुडा एरोस्पेस’ कंपनी शेअर बाजारात आयपीओ आणण्याची तयारी करत आहे.
‘गरुडा एरोस्पेस’ (Garuda Aerospace) कंपनीत धोनीने गुंतवणूक केली आहे. कंपनी आता ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग’ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. या आयपीओला सेबीची (SEBI) मंजुरी देखील मिळाली आहे. चेन्नईस्थित ड्रोन तंत्रज्ञान कंपनी ‘गरुडा एरोस्पेस’ या आयपीओद्वारे सुमारे 1,000 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन करत आहे. यामध्ये 750 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स (Fresh Issue) आणि 250 कोटी रुपयांची ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी, कंपनीने 118 कोटी रुपयांचा महसूल आणि 17.5 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे.
कंपनीत धोनीची गुंतवणूक किती?
‘गरुडा एरोस्पेस’च्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालात धोनीच्या गुंतवणुकीबाबत तपशील देण्यात आला आहे. अहवालानुसार, कंपनीने 12 मे 2022 रोजी धोनीसोबत एक ‘सेलिब्रिटी एंडोर्समेंट’ (ब्रँड जाहिरात) करार केला होता. या करारानुसार, धोनीला दोन वर्षांच्या कालावधीत एकूण सहा दिवस ब्रँड एंडोर्समेंट सर्विस द्यायची होती, ज्याच्या बदल्यात त्याला 7 कोटी रुपये मिळणार होते. कंपनीने ही रक्कम ज्या कालावधीत सर्विस दिली गेली, त्या काळात आपल्या हिशोबात (accounts) नोंदवली आहे. याव्यतिरिक्त, त्याच तारखेला धोनीसोबत ‘राईट टू सबस्क्राईब’ (RTS) करारही करण्यात आला होता. या कराराच्या अटींनुसार, 31 मार्च 2026 रोजी संपणाऱ्या कालावधीत कंपनीने धोनीला 1,025 शेअर्स दिले. या शेअर्ससाठीची ‘एक्सरसाइज प्राईस’ (खरेदी किंमत) प्रति शेअर 20,429.07 रुपये इतकी होती. अशा प्रकारे, ब्रँड एंडोर्समेंट्सव्यतिरिक्त, कराराचा भाग म्हणून धोनीला कंपनीमध्ये इक्विटी (शेअर्स) देखील मिळाली होती. मात्र, धोनीच्या या गुंतवणुकीच्या सद्यस्थितीबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
Call Me Bae S2 ची रिलीज डेट ठरली; 17 डिसेंबरला प्राइम व्हिडिओवर होणार प्रीमियर-
इतर कंपन्यांमधील गुंतवणूक
‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या एका अहवालानुसार (Tracxn च्या आकडेवारीवर आधारित), धोनीची गुंतवणूक विविध क्षेत्रांत पसरलेली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी, फिनटेक, ड्रोन तंत्रज्ञान, पर्यायी प्रथिने (अल्टरनेटिव्ह प्रोटीन) आणि क्रीडा तंत्रज्ञान (स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ब्लूस्मार्ट (BluSmart), खाताबुक (Khatabook), कार्स24 (Cars24), सेंट्रिसिटी (Centricity), रिगी (Rigi), ई-मोटोरॅड (EMotorad), शाका हॅरी (Shaka Harry), 7इंक ब्र्यूज (7Ink Brews), तागडा रहो (Tagda Raho) आणि रनॲडम (RunAdam) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
