Seema Haidar Pregnant : भारतीय सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी पाकिस्तानातून तिच्या चार मुलांसह भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा आई होणार आहे. सीमा हैदर सहाव्यांदा आई होणार आहे. ती सचिनच्या दुसऱ्या बाळाची आई होणार आहे. याबाबत सचिन आणि सीमाने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली आहे.
सीमाने यूट्यूबरवर सांगितले की, ती फेब्रुवारी 2026 मध्ये सचिनच्या (Seema Haidar Pregnant) दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. सीमा हैदर 7 महिन्यांची गर्भवती गेल्या वर्षी मार्चमध्ये सीमाने सचिनच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता तर आता ती लवकरच गुड न्यूज देणार आहे. ती 7 महिन्यांची गर्भवती असून फेब्रुवारी 2026 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. डॉक्टरांकडे नियमित तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्रसूतीची तारीख जाहीर केली आणि सांगितले की सीमा आणि बाळ दोघेही बरे आहेत. कॅल्शियमची थोडीशी कमतरता आहे, परंतु निरोगी आहाराने ही कमतरता लवकर दूर होईल अशी माहिती सचिनने या व्हिडिओमध्ये दिली आहे.
सीमाने 2023 मध्ये भारतात प्रवेश केला
सीमा हैदर पाकिस्तानची रहिवासी असून तिने दोन वर्षांपूर्वी 2023 मध्ये नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला होता. ती तिच्या चार मुलांसोबाबत भारतात आली होती. सीमा PUBG खेळली आणि याच काळात तिची भेट रबुपुरा येथील रहिवासी सचिन मीनाशी झाली. त्यांच्या संभाषणातून त्यांची मैत्री झाली आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. मीना सचिनशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानातून नेपाळला गेली, जिथे ती सून म्हणून भारतात आली.
50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य; फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर
तर दुसरीकडे सीमाने पाकिस्तानमधील तिच्या कुटुंबाला संदेश देण्यासाठी लग्नाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. फोटो व्हायरल झाला, ज्यामुळे गोंधळ उडाला. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सीमाची चौकशी केली, परंतु तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. सीमाचा पहिला पती गुलाम हैदर चारही मुले परत हवी आहेत आणि त्यांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. सीमाने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे.
