Seema Haider : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेत देशात असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहे. याचबरोबर देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा देखील रद्द करण्यात आला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर सीमा हैदर (Seema Haider) नाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सीमा हैदर भारतात राहणार की भारत सोडणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात आता सीमा हैदर यांच्या वकिलाना एक निवदेन जारी करत महत्वाची माहिती दिली आहे. या निवेदनात वकिल एपी सिंह यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या कट रचून पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. सीमा हैदर, रुग्णालयात दाखल असूनही, या बातमीने खूप दुखावल्या आहेत आणि व्यथित झाल्या आहेत.
पुढे वकिल एपी सिंह (AP Singh) यांनी म्हटले आहे की, सीमा हैदरने पाकिस्तान सोडून सनातन धर्म स्वीकारला होता आणि ती नेपाळमार्गे भारतात आली होती. त्यांचे लग्न सचिन मीनाशी झाले आहे आणि अलीकडेच त्यांनी भारतात एका बाळ मुलीला जन्म दिला आहे. शार्क व्हिसा-2 अंतर्गत भारत सरकारने घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यांनी असेही स्पष्ट केले की सीमा हैदरचे प्रकरण वेगळे आहे कारण त्यांचे सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे सादर केले आहेत. तसेच, त्यांची याचिका माननीय राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यांची उत्तर प्रदेश न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे आणि ती सर्व अटींचे पालन करून रघुपूर येथील तिच्या सासरच्या घरी राहत आहे. असं वकिल एपी सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
तर सीमा हैदर आणि त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या असा दावा देखील वकिल एपी सिंह यांनी केला आहे. तसेच या संदर्भात वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आणि आतापर्यंत सीमा, सचिन आणि त्यांच्या कुटुंबाचा भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सीमा भारतात आश्रयाच्या आधारावर राहत आहे आणि कायद्याचे पालन करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळी भागात पाणी उपलब्ध होणार …, ‘हा’ आहे नवीन प्रकल्प
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंंतर केंद्रीय सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या निर्णयानुसार सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहे.