Download App

सोनिया गांधींचे 77 व्या वर्षात पदार्पण : PM मोदींनी दिल्या आरोग्यपूर्ण अन् दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी आज (9 डिसेंबर) 77 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘X’ वर त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.”श्रीमती सोनिया गांधी जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. (Senior Congress leader Sonia Gandhi turn into the 77th year. On his birthday, Prime Minister Narendra Modi wished him a long and healthy life on ‘X’)

या नेत्यांनीही दिल्या शुभेच्छा :

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महासचिव केसी वेणुगोपाल, खासदार शशी थरूर आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही सोनिया गांधी यांना त्यांच्या 77 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पोस्टमध्ये खर्गे म्हणाले, “श्रीमती सोनिया गांधीजी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. त्या उपेक्षित लोकांच्या हक्काच्या समर्थक आहेत. याशिवाय त्या अत्यंत धैर्याने आणि निःस्वार्थपणे संकटांशी लढण्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

Delhi : ‘आप’ सरकारमध्ये खांदेपालट; आतिशी तब्बल 13 खात्यांच्या मंत्री

केसी वेणुगोपाल म्हणाले, सार्वजनिक सेवा, समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी सोनिया गांधींच्या वचनबद्धतेने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत आव्हानात्मक काळात त्यांनी अत्यंत संयमाने काँग्रेसचे नेतृत्व केले. सर्वांचे कल्याण आणि देशाचा जलद विकास करणाऱ्या युपीए सरकारच्या त्या शिल्पकार होत्या. आम्ही प्रत्येक टप्प्यावरील त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनासाठी आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहोत. सोनिया गांधी जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

BJP CM Face : मुख्यमंत्रिपदाचा तिढा! भाजपाचे पर्यवेक्षक मैदानात तरीही ‘पत्ते’ बंदच

सोनिया गांधी यांचे कौतुक करताना शशी थरुर म्हणाले की, त्यांनी अत्यंत खास पद्धतीने काँग्रेसचे नेतृत्व केले. त्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्या दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहो आणि आमच्या पक्षाला मार्गदर्शन करत राहो आणि देशाची सेवा करत राहोत, अशा शुभेच्छा देतो.तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही सोनिया गांधी यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला निरंकुश शक्तींपासून वाचवण्याच्या आमच्या संयुक्त प्रयत्नात त्यांची प्रगल्भ दृष्टी आणि अनुभवाचा खजिना मार्गदर्शक राहील, असे ते म्हणाले.

follow us