Download App

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंची पत्नी होणार खासदार; सागरिका घोष यांना राज्यसभेचे तिकीट

RajyaSabha Election : काही दिवसांपूर्वीचं तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. महुआ मोइत्रा यांची देशभरात अभ्यासू खासदार आणि मोदींवर सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून ओळख होती. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आणखी एक अभ्यासू चेहरा राज्यसभेत (RajyaSabha Election) पाठवण्याच निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष (Sagarika Ghosh) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने (TMC) 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष आणि नदीमुल हक यांना राज्यसभेवर पाठवणार आहेत. त्याचबरोबर सुष्मिता देव यांनाही आणखी एक संधी देण्यात आली आहे. याशिवाय टीएमसीने मतुआ समाजातील ममता बाला ठाकूर यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. सागरिका घोष ह्या ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी आहेत.

या संदर्भात, टीएमसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले, आम्ही ह्यांना शुभेच्छा देतो आणि आशा करतो की ते प्रत्येक भारतीयांच्या हक्कांसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करतील आणि तृणमूलचा वारसा पुढे चालवतील. एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पाच जागा रिक्त होणार आहेत. पाचवा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा (Bjp) असणार आहे. भाजपने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.

Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली

राज्यसभेवर जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी समोर आल्यानंतर बंगालमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सिंघवी आता राजस्थानमधून उमेदवारी मागण्याची शक्यता आहे.

‘इन्स्टाग्राम’चा राजकीय कंटेटला ब्रेक! लोकसभा निवडणुकांआधी नेते अन् पक्षांना मोठा धक्का
या वर्षी 68 खासदार निवृत्त होणार
या वर्षी राज्यसभेचे 68 सदस्य निवृत्त होणार आहेत. यापैकी 3 खासदारांचा कार्यकाळ 27 जानेवारीला पूर्ण झाला आहे, तर आणखी 65 सदस्य निवृत्त होणार आहेत. या 65 सदस्यांपैकी एक सदस्य 23 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहे, 55 सदस्य 2-3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत आणि 2 सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. याशिवाय 1 ते 13 जुलै दरम्यान 7 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.

भाजपचे बहुतांश खासदार निवृत्त होणार
ज्या खासदारांचा कार्यकाळ या वर्षी पूर्ण होत आहे. त्यापैकी सर्वाधिक 32 भाजपचे आहेत. यानंतर काँग्रेसचे 11, टीएमसीचे 4 आणि बीआरएसचे 3 खासदारांचा समावेश आहे. याशिवाय जेडीयू, बीजेडी आणि आरजेडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त होत आहेत. याशिवाय, NCP, SP, शिवसेना, TDP, YSRCP, SDF, CPI, CPI(M) आणि केरळ काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार या वर्षी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

Sanjay Raut : ‘मोदींनी आता केदारनाथ गुहेत जाऊन तपश्चर्या करावी’; राऊतांचा खोचक टोला

follow us