अजितदादांनी हेरला लोकसभेचा प्रमुख शिलेदार : धनंजय मुंडेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) प्रचार प्रमुख म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पुण्यातील युवा मिशन कार्यक्रमात ही घोषणा केली. धनंजय मुंडे यांना राज्यातील एक तरुण, आक्रमक नेते आणि मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाते. (Dhananjay Munde has been selected as the campaign chief for the Lok Sabha Election 2024 of the Nationalist Congress Party)
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा मिशन अर्थात युवा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे, अजित पवार यांची जोरदार भाषणे झाली. धनंजय मुंडे म्हणाले, अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन हाती घेतलं आहे. 2024 साली आपल्याला दादांनी मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी निवडणुकीत उभे राहणारे आणि पडद्यामागे राहणाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पाडली पाहिजे. तेव्हाच अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होतील. अजितदादांनी आम्हाला उभं केलं. त्यांच्यामुळेच आम्ही आमदार झालो. सर्व पक्षांचा विचार केला तर सर्वात तरुण आमदार हे अजितदादांनी निवडून दिले आहेत.
Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली
यावेळी अजित पवार म्हणाले, बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाचा विकास करता आला पाहिजे म्हणून भूमिका स्वीकारली. आज ५०-५२ आमदार पाठिंबा देतात, याचा अर्थ त्यांच्याही मनात खदखदत होती, त्यांचेही विचार होते. पण वरिष्ठ समजून घेत नव्हते, समजून घेतल्याचे दाखवायचे पण निर्णयावर येत नव्हते. त्यामुळे भूमिका घ्यावी लागली. त्यातून कुणाचा अनादर करण्याचा, कमीपणा व्हावा अशी भावना कुणाचीही नाही. 30-32 वर्षे काम करताना प्रशासनावर पकड आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची जाण आहे. निर्णय धाडसाने कसे घ्यावेत याची आम्हाला माहिती आहे. कोणताही घटक वंचित राहता कामा नये याची माहिती आहे.
अजितदादांनाच 2024 मध्ये मुख्यमंत्री करायचं; युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं उद्दीष्ट ठरलं
जगात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यांना व्हिजन आहे, 18 तास काम करतात. अनेक विमानतळे झाली, राष्ट्रीय हायवे, ब्रीज, टनेल झाली, बंदरे झाली, पाण्याचे प्रश्न सुटत आहे. 80 कोटी जनतेला मोफत अन्न धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे. परकीय गुंतवणुकीसाठी आपलं एक भक्कम स्थान त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे ते मान्य करायला हवे, त्यांच्या व्हीजनचा फायदा महाराष्ट्राला देशाला करून घेतला पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केले.