Several police injured in stone pelting in Murshidabad violence : वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये उसळलेला हिंसाचार अद्याप देखील थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुर्शिदाबादमधील शमशेरगंज या भागात आज पुन्हा परिस्थिती बिघडली आहे. काही समाजकंटकांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांना आणि पोलिसांना पोलिसांवर दगडफेक केली.
टँकर संपामुळे मुंबईकरांचे हाल अन् आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल
तसेच दक्षिण 24 परगणा जिल्ह्यामध्ये भांगड येथे देखील हिंसाचार उसळली या घटनेमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सिलिगुडी या ठिकाणी झालेल्या गटांमधील वादात तोडफोड करण्यात आली आहे. यातील मुर्शिदाबाद मधील उसळलेल्या हिंसाचारामध्ये तीन जणांचा मृत्यू आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
रणजित कासलेंना आणखी एक दणका, एसपी नवनीत कावतांची महत्वाची माहिती
केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर या विधेयकला राष्ट्रपतींनी मंजूरी दिलेल्यानंतर देशात वक्फ सुधारणा कायदा (Waqf Act 2025) लागू करण्यात आला आहे मात्र आता या कायद्याविरोधात देशातील अनेक राज्यात आंदोलने होताना दिसत आहे.
शुक्रवार 12 एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये देखीय या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाला असून मुर्शिराबाद जिल्ह्यात (Murshidabad Violence) झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 110 जणांना अटक केली आहे.
बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होणार नाही
तर दुसरीकडे वक्फ कायद्यावरुन बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्यात वक्फ कायदा लागू होणार नसल्याची माहिती मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिली आहे तसेच लोकांना शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. आम्ही वक्फ कायद्याच्या बाजूने नाही. पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होणार नाही असं त्यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार; तृप्ती देसाईंचा गंभीर दावा
तसेच मुख्यमंत्री ममता यांनी लोकांना आवाहन करताना म्हटले की, सर्व धर्माच्या लोकांना माझे नम्र आवाहन आहे की कृपया शांत आणि संयमी राहा. धर्माच्या नावाखाली कोणतेही चुकीचे कृत्य करू नका. प्रत्येक व्यक्तीचे जीवन मौल्यवान आहे, राजकारणासाठी दंगली भडकावू नका. जे लोक दंगली भडकावत आहेत ते समाजाचे नुकसान करत आहेत.