धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार; तृप्ती देसाईंचा गंभीर दावा

धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार; तृप्ती देसाईंचा गंभीर दावा

Trupti Desai on Dhananjay Munde for Walmik karad Encounter : निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी एक गंभीर दावा केला आहे की, वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर होती. त्यासाठी मला 5 ते 50 कोटी देण्यात येणार होते. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील तसाच गंभीर दावा केला आहे. की, धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार.

काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार आहे की, माहित नाही पण मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. त्याचा खून होऊ शकतो. त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार आहे. त्यामधील झोपता-झोपता श्वास बंद पडतो. त्यामुळे एक तर त्याला मारला जाऊ शकतो किंवा तो कोठडीमध्ये मृत अवस्थेत सापडला जाऊ शकतो. असं घोषित केले जाऊ शकतो. कारण या प्रकरणामध्ये तो प्रमुख आहे. त्याच्यामुळे राजकीय पदावर असणारे मोठे मोहरे अडचणीत आले आहेत. म्हणून त्याला संपवले जाऊ शकते.

मोदीजी, संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न 

त्यामुळे रंजीत कासले यांनी केलेल्या दाव्याची चौकशी केली जावी. जेणे करून त्यांना सुपारी कुणी दिली होती, का दिली होती? हे समोर येईल. तर धनंजय मुंडे यांची देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्रिपद गेले आहे. त्यानंतर करूणा शर्मांच्या प्रकरणामध्ये त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे राजकारणात मित्र वैगेरे गोष्टी स्वत: ला वाचवण्यासाठी लांब केल्या जाऊ शकतात. त्यामुळे धनंजय मुंडे किंवा त्यांचा गटच वाल्मिक कराडला संपवणार. असा दावा देसाई यांनी केला आहे.

काय म्हणाले रणजित कासले?

संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. (Encounter) यावेळी कासले यांनी एन्काऊंट कसा केला जातो याचीही माहिती दिली आहे. कासले यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दावे केले आहेत.

महानगरपालिका आयुक्तांच्या बैठकीला यश! टँकरचालकांकडू संप मागे घेतल्याचे जाहीर

मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं. एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही. जर चौकशी करायची असेलच तर केंद्राची यंत्रणा बसवा, मग त्यातून सत्य बाहेर पडेल. फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असं त्यांनी सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube