Shankracharay Swami Avimukteshwar Question to Modi and Dhirendra Shatri on Pahalgam attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा (Pahalgam Terror Attack) अतिरेक्यांनी बळी घेतला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. हिंदू असल्याची खात्री करून घेत त्यांना गोळ्या घातल्या. मानवतेला काळिमा फासणारं कृत्य अतिरेक्यांनी केलं. त्यानंतर आता देशभर संतापाची लाट उसळलेली असताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारला सवाल केला तसेच बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांचे देखील कान टोचले आहेत.
काय म्हणाले शंकराचार्य?
दहशतवादी देशात कसे घुसले? चाळीस मिनिट ते लोकांना मारत होते. सहजा सहजी ते पळूनही गेले. त्यामुळे मोदी सरकारने या प्रकरणात सखोल चौकशी करावी. तसेच आपण देशांमधील शत्रूंना ओळखू शकत नाही. तोपर्यंत केवळ देशाच्या सुरक्षेवर चर्चाच होत राहील. त्यामुळे देशाच्या सुरक्षेमध्ये एवढी मोठी चूक कशी काय झाली? दहशतवादी उघडपणे कसे काय फिरत होते? जर हल्ल्यानंतर त्यांचे फोटो मिळत असतील तर याची माहिती अगोदरच का नव्हती? असं म्हणत स्वामी अभिमुख्येश्वरनंद यांनी मोदी सरकारला खडसावले आहे.
बदला घेणार, पाकिस्तानवर होणार लष्करी कारवाई, सरकारकडून तयारी सुरु
त्याचबरोबर यावेळी अविमुक्तेश्वरानंद यांनी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांना देखील चांगलेच सुनावले आहे. जर धीरेंद्र शास्त्री हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींची चिठ्ठी काढत असता तर त्यांनी या घटनेची चिठ्ठी का काढली नाही तसेच झाले असते तर सर्वांनाच याची माहिती मिळाली असती एकीकडे धीरेंद्र शास्त्री हिंदुराष्ट्र बनवण्याची गोष्ट करतात त्यांनी हिंदू गाव देखील बनवलेला आहे. जगावत ते स्वतः विराजमान आहे ते गाव अगोदरच हिंदू आहे त्यामुळे त्या गावाला हिंदू गाव बनवण्याची गरजच नव्हती अशी टीका देखील यावेळी शंकराचार्यांनी केली.