दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर महायुतीतील मतभेदांवर शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
Shinde Modi meeting या भेटीत केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Shinde’s reaction to differences in the Grand Alliance after Modi’s meeting in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज नवी दिल्लीतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत त्यांनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुका राम महाराजांची मूर्ती भेट दिली. केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Video : महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरुन ‘तू तू मैं मैं’; नितीन गडकरी वैतागले, व्हिडिओ होतोय व्हायरल
एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
Phaltan Case : मृत महिला डॉक्टरने प्रशांतला प्रपोज केलं होतं; आरोपी बनकरच्या बहिणीचा दावा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “या निवडणुका ग्रासरूट लेव्हलच्या असतात. कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्त्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महायुतीमधील अंतर्गत मतभेदांबाबत शिंदे यांनी सांगितले, “महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत. मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी,” असे त्यांनी सांगितले. पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना, “धंगेकरांना मी स्पष्ट संदेश दिला आहे, आवश्यक असल्यास मी स्वतः त्यांच्याशी बोलेन,” असे शिंदे म्हणाले.
Phaltan Case : खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए सर्वांना… फलटण प्रकरणात धसांची एन्ट्री
बिहार निवडणुकीबाबत शिंदे यांनी आत्मविश्वास व्यक्त करताना सांगितले की, “एनडीए गटबंधन निश्चितच बहुमताने विजय मिळवेल.” मुंबई, ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.“केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि मोदी नेहमी महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात,” असेही शिंदे यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Phaltan Doctor Suicide Case : दानवेंनी पीएंची नावं जाहीर करत सांगितलं खासदाराचं कनेक्शन
साताऱ्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. एका आरोपीला अटक झाली असून इतरांना लवकरच अटक होईल. दोषींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
