Download App

केजरीवालांना जामीन मिळताच पवारांची सूचक पोस्ट; म्हणाले, एखाद्याला नामोहरम करण्याचा कट…

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Post After Arvind Kejriwal Gets Bail : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर शरज पवारांनी (Sharad Pawar) एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम असल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे आप नेते मनीष सीसोदिया आणि आतिशी यांनी न्यायालयाच्या निकालानंतर एकमेकांचे अभिनंदन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

भारतातील महिलांसाठी प्रमुख कायदेशीर अधिकार; समान वेतन ते रात्रीच्या वेळी अटक न करण्याचा कायदा

पवारांची पोस्ट नेमकी काय?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाल्याचे पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सिसोदिया-आतिशी यांनी साजरा केला आनंद

दिल्लीचे मुख्यमंत्री यांना जामीन मिळाल्यानंतर आपकडून एक्सवर सत्यमेव जयते अशी पोस्ट करण्यात आली आहे तर, दुसरीकडे न्यायालयाचा निकाल आप नेते मनिष सीसोदिया आणि आतिशी लॅपटॉपवर बघत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. न्यायालयाकडून केजरीवाल यांना जामीन मंजूर होताच आतिशी आणि सिसोदिया यांनी एकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला आहे.

 

follow us