Share Market Crash: भारतीय शेअर बाजारात ( Share Market) गेल्या आठ दिवसांमध्ये मोठी पडझड होत आहे. मंगळवारी तर बाजारात मोठा भूकंप आला. निफ्टी 50 निर्देशाकांमध्ये मोठी पडझड झाली. निफ्टी तब्बल साडेतीनशे पाँइटने पडलीय. आता निफ्टी 25,200 पर्यंत खाली आली आहे. काही दिवसांपूर्वी निफ्टी (NIFTY 50) 26 हजार 300 पर्यंत गेली होती. तिथून तब्बल अकराशे पाँइटने घट झालीय. तर सेन्सेक्स (BSE SENSEX) तर एका दिवसात एक हजार पाँइटने पडलाय. तर बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकही घोसळले आहेत. दोन्ही निर्देशांक तब्बल एक टक्क्यांनी घटले आहे. सर्वत्र क्षेत्रातील शेअरमध्ये जोरदार विक्री झाली आहे.
आज बाजार जोरदार आपटला. निफ्टीमध्ये 353 पाँइटने घसरण झाली असून, निफ्टी 25,232 वर बंद झालीय. तर बीएसई सेसेंक्स 1065 पाँइटने मोठी घसरण झाली आहे. सेसेंक्स 82,180 वर बंद झालंय. बाजार पडण्यामागील जागतिक व स्थानिक कारणे आहेत.
जागतिक ट्रेड वॉर
अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धडाधड अनेक देशांवर टॅरिफ लावत आहे. त्यामुळे जागतिक बाजारावर गंभीर परिणाम होत आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये व्यापारामध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कोसळत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात होत आहे. टॅरिफबरोबर भू राजकीय आणि भू-आर्थिक मुद्देही कारणीभूत आहे.
विदेशी संस्थांकडून विक्री
विदेशी गुंतवणूक संस्था भारतीय शेअर बाजारातून आपला पाय काढता घेत आहे. त्यामुळे जोरदार विक्री होत आहे. सोमवारी एका दिवसात परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 3 हजार 262 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये परदेशी गुंतवणूकदाांनी तब्बल 29 हजार 315 कोटी रुपये काढलेत. विदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर विक्रीमुळे बाजारात दबाव निर्माण झाला आहे. तर देशातील गुंतवणूकदारही सावध पवित्रा घेत आहेत. त्यामुळे ते जास्त खरेदी करत नाहीत.
तिमाही निकालाचाही फटका
भारतीय कंपन्यांची या तिमाहीतील कामगिरीही चांगली झालेली नाही. आयटी सेक्टरमधील कंपनी विप्रोची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवारीही शेअर बाजारत विप्रोचे शेअर्सच्या किंमतीत घट झालीय. त्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांकमध्ये 1.1 टक्के पडला आहे.
आशियातील बाजार कमजोर
आशियामधील अनेक देशातील शेअर बाजारमध्ये घट झालीय. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक हिरव्यात बंद झाला. पण जपानाची निक्केई 225, हाँगकाँग निर्देशांकामध्ये घट झालीय. सोमवारी अमेरिका बाजाराला सुट्टी होती. परंतु वॉल स्ट्रीट फ्यूचर्स एक टक्के घट झालाय.
घसरता रुपया
भारतीय रुपयाच्या मुल्यामध्येही घट होत आहे. अमेरिका डॉलरच्या तुलनेत रुपया आठ पैशांनी घसरला. रुपया आता 90.98 वर आला आहे. म्हणजे 91 रुपयांमध्ये एक डॉलर मिळतो. त्याचा परिमाण बाजारावर होत आहे.
अमेरिका सुप्रीम कोर्टाचा भविष्यातील निर्णयाचा फटका
अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रॅम्प यांनी लावलेल्या टॅरिफवर अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायचा आहे. त्याचा परिणाम जागतिक आणि भारतीय शेअर बाजारात दिसत आहे.
कच्चा तेलाच्या भावात वाढ
आंतरराष्ट्रीय बाजार ब्रेंट क्रूडच्या (कच्चे तेल) किंमती वाढत आहे. मंगळवारीही या किमतीत 0.11 टक्के वाढ झाली आहे. आता एका बॅरलची किंमत 64 डॉलरवर गेलीय. तर कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतात महागाई वाढू शकते. त्यामुळे शेअर बाजारात घसरण होत आहे.
