Share Market crash on valentine day investors 7 lakh crore lost : शेअर बाजारात आज व्हॅलेंनटाईन डे या प्रेमाच्या दिवशी देखील मोठी पडझड झाली आहे. सलग आठव्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रूपये बुडाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमधील धास्ती कायम आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंकेने रचला इतिहास, विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी केला पराभव
यामध्ये स्मॉलकॅप आणि मिडकॅपच्या शेअर्समध्ये सेर्वात जास्त नुकसान झालं आहे. बीएसईच्या मिडकॅप इंडेक्स 2.5 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स 3.54 टक्क्यांवर बंद झाला आहे. तसेच निफ्टीचे सर्व 13 सेक्टरल इंडेक्स देखील लाल रंगात पाहायला मिळाले. ज्यामध्ये कंझ्युमर ड्यूरेबल्स, फार्मा, यूटिलिटी आणि कॅपिटल गुड्स इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिकने पडून बंद झाला आहे.
बावनकुळेंची मध्यस्थी… धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात समझौता? गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये एक वादळच आल्याचं वातावरण आहे. ट्रम्प यांनी सुरु केलेलं व्यापार युद्ध, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून करण्यात येत (Market ) असलेली विक्री, सप्टेंबरच्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेसंदर्भातील जीडीपीमधीच्या वाढीचा मंदावलेला वेग यासह इतर कारणांमुळं भारतीय शेअर बाजारात खळबळ माजली आहे.
आता करता येणार क्रिकेटचा अभ्यास, मुंबई विद्यापीठात मिळणार पदवी, जाणून घ्या कसा असेल अभ्यासक्रम?
शेअर बाजारात मोठ्या प्रमणात घसरण सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून केली जाणारी विक्री हे बाजार कोसळण्याचं प्रमुख कारण आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 88139 कोटी रुपये काढून घेतले आहेत. यामुळं भारतीय गुंतवणूकदारांना मोठं नुकसान झालंय.
घसरण कोणत्या कारणांमुळं?
– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं व्यापार युद्धाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळं महागाई वाढू शकते.
– अमेरिकेची सत्ता स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली. यामुळं शेअर बाजार अस्थिर झाला.
– एकीकडे अमेरिकन डॉलर मजबूत होत आहे, तर दुसरीकडे भारताच्या रुपयामधील घसरण सुरु आहे. ज्याचा परिणाम शेअर बाजारावर होतोय.
– फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरांमध्ये कपात केल्यानंतर गुंतवणूकदार अमेरिकन बाजाराकडे आकर्षित होत आहेत.
– भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदार त्यांचे समभाग विकत आहे. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होतं आहे.