चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंकेने रचला इतिहास, विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी केला पराभव

  • Written By: Published:
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंकेने रचला इतिहास, विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी केला पराभव

SL vs AUS 2nd ODI: चॅम्पियन्स ट्रॉफीपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी (SL vs AUS 2nd ODI) पराभव झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला फक्त 107 धावा करत्या आल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 29 धावा केल्या. जोश इंगलिस फक्त 22 धावा करत्या आल्या. तर श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालागे (Dunith Vellalaage) आणि वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यांनी गोलंदाजीत शानदार कामगिरी केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 4 गडी गमावून 281 धावा केल्या. श्रीलंकेकडून निशान मदुशंका अर्धशतक झळकावले. त्याने 51 धावांची खेळी खेळली. यानंतर कुसल मेंडिसने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने 11 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. कर्णधार अस्लंकाने नाबाद 78 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. ऑस्ट्रेलिया 107 धावांवर कोसळला 281 धावांच्या प्रत्युत्तरात संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 24.2 षटकांत 107 धावांवर ऑलआउट झाला.

कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 29 धावा केल्या. जोश इंगलिस फक्त 22 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड 18 धावा करून बाद झाला. मॅथ्यू शॉर्ट 2 धावा करून बाद झाला. आरोन हार्डीला खातेही उघडता आले नाही. श्रीलंकेकडून डुनिथ वेल्लागेने 4 विकेट्स घेतल्या. त्याने 7.2 षटकांत 35 धावा दिल्या. वानिंदू हसरंगाने 7 षटकांत फक्त 23 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 2 मेडन ओव्हर्स टाकल्या. असिथ फर्नांडोने 4 षटकांत 23 धावा देत 3 बळी घेतले.

आता करता येणार क्रिकेटचा अभ्यास, मुंबई विद्यापीठात मिळणार पदवी, जाणून घ्या कसा असेल अभ्यासक्रम?

श्रीलंकेने मालिका जिंकली

श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 174 धावांनी पराभूत करून मोठा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सर्वात मोठा एकदिवसीय विजय आहे. या विजयासह श्रीलंकेने मालिकाही जिंकली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 49 धावांनी पराभूत केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube