World Cup 2023: विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला धक्का, हसरंगा दुखापतीने टीममधून बाहेर

World Cup 2023: विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला धक्का, हसरंगा दुखापतीने टीममधून बाहेर

World Cup 2023: 5 ऑक्टोबरपासून आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. श्रीलंकेने विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. दासुन शनाका विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर कुसल मेंडिसकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त अष्टपैलू वानिंदू हसरंगाला या संघात स्थान मिळालेले नाही.

दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ आपल्या विश्वचषकची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने करेल. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका 7 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. तर, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ-
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सादिरा समरविक्रमा, चारिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथ, महीश तीक्षणा, दुनिथ वेलालगे, कासुन राजिथा, मथिश पथिराना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंक

Delhi Robbery : दिल्लीमध्ये थरारक चोरी! 25 कोटींच्या दागिन्यांची कशी केली चोरी पाहा…

वनिंदू हसरंगाला दुखापत
अलीकडेच लंका प्रीमियर लीग (LPL) दरम्यान अष्टपैलू वानिंदू हसरंगा जखमी झाला. याच कारणामुळे त्याची अंतिम संघात निवड झालेली नाही. वानिंदू हसरंगा हा लंका प्रीमियर लीगमधील बी-लव्ह कँडी संघाचा कर्णधार होता. वनिंदू हसरंगा याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

के. अन्नामलाई : तमिळनाडूत भाजपचं अख्ख राजकारण फिरविणारा मोदी-शाहंचा हुकमी एक्का

बी-लव्ह कॅंडी संघाने लंका प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. मात्र, वनिंदू हसरंगा दुखापतीमुळे विजेतेपदाचा सामना खेळू शकला नाही. त्याचवेळी वनिंदू हसरंगा दुखापतीमुळे आशिया कपमध्ये खेळू शकला नाही. पण हसरंगा वर्ल्डपर्यंत फिट असेल असा विश्वास होता. मात्र विश्वचषक संघात वानिंदू हसरंगाची अनुपस्थिती हा श्रीलंकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube