Share Market : गुंतवणूकदारांना मोठा फटका; एकाच दिवशी 90 हजार कोटी पाण्यात

Share Market Invester Loss 90,000 Crore :  शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आयटी शेअर्समध्ये घसरण झाल्याने आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट कोसळले आहे. सेन्सेक्स 372 अंकांनी खाली आला तर निफ्टी 18,200 च्या खाली आला आहे. सर्वात जास्त घसरण आयटी, टेक, आईल, पॉवर, गॅस या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 17T170836.576

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 17T170836.576

Share Market Invester Loss 90,000 Crore :  शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आयटी शेअर्समध्ये घसरण झाल्याने आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट कोसळले आहे. सेन्सेक्स 372 अंकांनी खाली आला तर निफ्टी 18,200 च्या खाली आला आहे. सर्वात जास्त घसरण आयटी, टेक, आईल, पॉवर, गॅस या शेअर्समध्ये दिसून आली. या सगळ्यामध्ये आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे तब्बल 90 हजार रुपये बुडाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आज मोठा फटका बसला आहे.

आज शेअर मार्केट बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 371.83 अंकानी घसरून 61,560.64 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हा 104.75 अंकांनी घसरून 18,181.75 अंकांवर बंद झाला आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

याचबरोबर बीसईमध्ये लिस्टेड कंपन्यांची शेअर बाजारातील गुंतवणूक आज कमी झाली असून ती आता 277.22 लाख कोटी रुपयांवर आली आहे. कालच्याच दिवशी 16 मे रोजी ही गुंतवणूक 278.12 लाख कोटी रुपये एवढी होती. त्यामुळे बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांची शेअर बाजारातील गुंतवणूक आज 90 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास गुंतवणूकदारांना आज एकुण 90 हजार कोटी रुपयांना फटका बसला आहे.

आयटी हार्डवेअर क्षेत्रासाठी आनंदाची बातमी! ‘या’ योजनेला मंजुरी

Exit mobile version