आयटी हार्डवेअर क्षेत्रासाठी आनंदाची बातमी! ‘या’ योजनेला मंजुरी

आयटी हार्डवेअर क्षेत्रासाठी आनंदाची बातमी! ‘या’ योजनेला मंजुरी

Union Cabinet Decisions: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने IT हार्डवेअर क्षेत्रासाठी(IT hardware sectors) 17 हजार कोटी रुपयांच्या उत्पादन-संबंधित प्रोत्साहन योजनेला मंजुरी (Approval of Incentive Scheme)दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानास (Fertilizer subsidies)देखील मान्यता दिली आहे.

फडणवीसांच्या पीएने निधी आणला; भाजप आमदाराने थेट राजीनाम्याचा इशारा दिला

केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानासही मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात यावर्षी देशात 100 अब्ज डॉलरचे उत्पादन झाले आहे. यासह, गेल्या वर्षी 11 बिलीयन डॉलर्स मोबाइलची विक्रमी निर्यात झाली.

पीएलआय फॉर आयटी हार्डवेअरला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दूरसंचार उत्पादन क्षेत्रात 42 कंपन्यांनी पहिल्या वर्षी 900 कोटी रुपयांऐवजी 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, देशात 325 ते 350 लाख मेट्रिक टन युरियाचा वापर होतो. 100 ते 125 लाख मेट्रिक टन डीएपी आणि एनपीके वापरले जातात. 50-60 लाख मेट्रिक टन एमओपी वापरला जातो. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळावीत म्हणून केंद्र सरकारने सबसिडी वाढवली, पण एमआरपी वाढली नाही.

खरीप हंगामातील पिकांसाठी केंद्र सरकार खतांच्या किंमतीत वाढ करणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार खरीप हंगामातील पिकांसाठी अनुदान म्हणून 1 लाख 8 हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube