Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्रात (Maharashtra)छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)मराठी बांधवांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Chhatrapati Sambhaji: ‘छत्रपती संभाजी’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्र काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (दि.19 फेब्रुवारी 2024)कार्यक्रमाचं राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला योगी आदित्यनाथ यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दुहेरी हत्याकांड! वकिलांच्या मागणीवर फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रात म्हटलं आहे की, उत्तरप्रदेशमधील मराठी समाजाचं वतीनं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं राष्ट्रीय स्तरावर आयोजन केलं आहे. त्याचा आपल्याला अत्यंत आनंद आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे युग परिवर्तनाचे शिल्पकार होते. ते आपल्या देशाचे फक्त राजे नव्हते तर ते आपल्या प्रेरणेचा स्त्रोत देखील आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं देश आणि धर्मासाठीचं योगदान सदैव स्मरणात राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वधर्म आणि स्वदेशासाठी महान कार्य केलं आहे. अशा महान राजाची जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी केली जात आहे, याचा आपल्याला आनंद आहे.
राष्ट्र आणि धर्मासाठी आपले असलेले समर्पण आणि विरता आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्येही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा मोठा उत्सव पाहायला मिळतो. विविध संस्था, शाळा, कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणल्या जाणार आहेत. त्यासाठी शिवप्रेमी सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्रामध्येही शिवजयंतीचा मोठा उत्साह यंदा पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी शिवजंयती यंदा उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय शिवभक्तांनी घेतला आहे. तसेच यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.