Shivraj Singh Chouhan On Air India Flight : प्रवाशांना वाहतुकीच्या विविध पद्धतींमध्ये समस्या येत आहेत, परंतु त्यावर कोणताही उपाय होत नाही, असा आरोप काँग्रेसने अनेकदा केलाय. पण याची प्रचिती आता खुद्द केंद्रिय मंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan) यांनाच आलीय. त्यांनी X पोस्ट करत हा अनुभव शेअर केलाय. एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये (Air India Flight) त्यांना तुटलेली खुर्ची देण्यात आल्याचं समोर आलंय.
केंद्रीय मंत्र शिवराज सिंह चौहान यांनी X पोस्ट करत सांगितलं की, आज मला भोपाळहून (Bhopal) दिल्लीला यायचं होतं. त्यासाठी मी एअर इंडियाच्या फ्लाइटमधून प्रवास करीत होतो. मला सीट क्रमांक 8C मिळाली. मी जाऊन सीटवर बसलो, खुर्ची तुटलेली होती. तिच्यावर बसणं अत्यंत वेदनादायक होतं.
सोशल मीडियावर NO अश्लील कटेंट! इन्फ्लुएंर्सना मोठा झटका, सरकार करतंय जोरदार तयारी
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियाच्या सेवांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘मला वाटले होतं की टाटांनी एअर इंडियाचे व्यवस्थापन हाती घेतले आहे, ज्यामुळे एअरलाइनची सेवा सुधारली. परंतु, तो माझा गैरसमज होता. बसण्याच्या गैरसोयीबद्दल मला काही वाटत नाही. पण प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारून त्यांना वाईट आणि अस्वस्थ जागांवर बसवणे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
आज मुझे भोपाल से दिल्ली आना था, पूसा में किसान मेले का उद्घाटन, कुरुक्षेत्र में प्राकृतिक खेती मिशन की बैठक और चंडीगढ़ में किसान संगठन के माननीय प्रतिनिधियों से चर्चा करनी है।
मैंने एयर इंडिया की फ्लाइट क्रमांक AI436 में टिकिट करवाया था, मुझे सीट क्रमांक 8C आवंटित हुई। मैं जाकर…
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 22, 2025
केंद्रीय मंत्री चौहान यांनी एअर इंडियाला सुधारात्मक कारवाईचे आवाहन करताना पुढे लिहिलंय की, ‘एअर इंडिया व्यवस्थापन भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशा गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी पावले उचलेल का, की प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकर पोहोचण्याच्या मजबुरीचा फायदा घेत राहील?’ केंद्रीय मंत्र्यांच्या पोस्टला उत्तर देताना एअर इंडियाने माफी देखील मागितलीय. त्यांनी म्हटलंय की, प्रिय साहेब, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आम्ही या प्रकरणाची काळजीपूर्वक तपासणी करत आहोत, याची खात्री बाळगा.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी अनिल भाईदास पाटील अन् लहू कानडे यांची नियुक्ती
विमान वाहतूक आणि रेल्वे क्षेत्रातील समस्यांवरून काँग्रेस पक्षाने शनिवारी सरकारवर टीका केली. एअर इंडियाच्या विमानात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना झालेल्या गैरसोयीचा उल्लेख करत काँग्रेसने म्हटलंय की, सरकारने प्रत्येक क्षेत्र उद्ध्वस्त केलंय. प्रवाशांना ट्रेन आणि विमानांमध्ये समस्या येत आहेत, पण त्यात कोणतीही सुधारणा होणार नाही. लोक तक्रारी करत राहतात, पण ऐकू येत नाही. आता केंद्रीय मंत्र्यांना समस्या जाणवली आहे.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियाच्या सेवांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर निकृष्ट दर्जाच्या जागांसाठी एअरलाइन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर काँग्रेसने ही टिप्पणी केली. काँग्रेसने ट्विटरवरील पोस्टमध्ये आरोप केलाय की, प्रवाशांना वाहतुकीच्या विविध पद्धतींमध्ये समस्या येत आहेत, परंतु त्यावर कोणताही उपाय नाही. लोक तक्रारी करत राहतात आणि व्हिडिओ बनवत राहतात, पण ऐकू येत नाही. आता शिवराजजींना समस्या असल्याने ते ट्विट करत आहेत, कदाचित यावर कारवाई केली जाईल.