Siddaramaiah On PM Modi: मोदींच्या शुभेच्छांना सिद्धरमय्यांचे उत्तर; शपथविधी दिवशीच काँग्रेस-भाजप संर्घषाला सुरूवात

Siddaramaiah On PM Modi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी शनिवारी (20 मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्यासह राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही शपथ घेतली, जे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जवळून काम करण्याची आशा व्यक्त केली. खरं तर, पीएम मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 20T174132.642

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 20T174132.642

Siddaramaiah On PM Modi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी शनिवारी (20 मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्यासह राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही शपथ घेतली, जे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जवळून काम करण्याची आशा व्यक्त केली.

खरं तर, पीएम मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल डीके शिवकुमार यांचे अभिनंदन केले. याला उत्तर देताना सिद्धरामय्या यांच्या कार्यालयाने म्हणजेच सीएमओने उत्तर दिले की, अभिनंदनासाठी पंतप्रधान मोदींचे आभार. पुढे म्हणाले की सहकारी संघराज्याबाबत आम्हाला तुमच्या (पीएम मोदी) सहकार्याची अपेक्षा आहे.

https://www.youtube.com/watch?v=WYyIDGgDii0&t=2s

मंत्री कोण झाले?
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्याशिवाय प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष जी परमेश्वरा, एमबी पाटील, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियंका खरगे, ज्येष्ठ नेते केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, सतीश जारकीहोली, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर यांनीही शपथ घेतली. श्री कांतीरवा स्टेडियमवर झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली.

Karnataka : सिद्धरामय्यांच्या शपथविधीला पवारांची ‘खास’ उपस्थिती; विरोधकांच्या एकजुटीकडे ठाकरेंनी फिरविली पाठ

शपथविधी सोहळ्याला यांची उपस्थिती

काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमातून काँग्रेसने विरोधी एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती आणि इतर अनेक विरोधी पक्षांचे नेत्यांनीही या समारंभाला उपस्थिती दर्शवली. परंतु या शपथविधी सोहळ्यात भाजपचे नेते नसल्याचे दिसून आले.

Exit mobile version