महाराष्ट्रासह 16 राज्य अन् तीन केंद्र शासित प्रदेशांमध्ये होणार SIR; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

SIR in 16 states by Central Election Commission केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या SIR च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे.

SIR

SIR

SIR in 16 states and three union territories including Maharashtra announcement by Central Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन म्हणजेच SIR (Special Intensive Revision) च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. या टप्प्यात देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार आहे. जनगणनेअंतर्गत सुरू असलेल्या घरगुती नोंदणी प्रक्रियेला लक्षात घेऊन हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. जेणेकरून दोन्ही प्रक्रिया समन्वयाने पार पडतील.

कुठे होणार SIR चा तिसरा टप्पा?

या टप्प्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, ओडिशा, झारखंड तसेच दिल्ली यांसह एकूण 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीरहित करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

3.94 लाख BLO घराघरांत जाऊन पडताळणी करणार

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यात सुमारे 3.94 लाख बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरांत जाऊन 36.73 कोटी मतदारांची पडताळणी करतील. या प्रक्रियेत राजकीय पक्षांकडून नियुक्त 3.42 लाख बूथ लेव्हल एजंट (BLA) देखील सहकार्य करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर BLA नियुक्त करण्याचे आवाहन आयोगाने सर्व राजकीय पक्षांना केले आहे, जेणेकरून प्रक्रिया पारदर्शक आणि सर्वसमावेशक राहील.

CM फडणवीस ‘बुलेट’ वरून विधानभवनात दाखल

आयोगाने सांगितले की, तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख वगळता संपूर्ण देशात विशेष सखोल पुनरावलोकनाचे काम पूर्ण होईल. या तीन भागांत जनगणनेचा दुसरा टप्पा आणि डोंगराळ व हिमवृष्टीच्या परिस्थितीमुळे नंतर कार्यक्रम जाहीर केला जाईल.

खराब काम केलं तर रगडल्याशिवाय राहणार नाही; पालखी मार्गाच्या कामावरून गडकरींचा कडक इशारा

आयोगाच्या मते, पहिल्या दोन टप्प्यांत 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 59 कोटी मतदारांचे पुनरावलोकन करण्यात आले. या मोहिमेत 6.3 लाखांहून अधिक BLO आणि 9.2 लाख BLA सहभागी झाले होते.

SIR तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक

1 जुलै 2026 पासून: ओडिशा, मिझोरम, सिक्कीम आणि मणिपूर
अंतिम मतदार यादी प्रकाशन: 6 सप्टेंबर 2026
1 जुलै 2026 पासून: दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव
अंतिम मतदार यादी प्रकाशन: 11 सप्टेंबर 2026
1 जुलै 2026 पासून: उत्तराखंड
अंतिम मतदार यादी प्रकाशन: 15 सप्टेंबर 2026
1 जुलै 2026 पासून: आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा आणि चंदीगड
अंतिम मतदार यादी प्रकाशन: 22 सप्टेंबर 2026
1 ऑक्टोबर 2026 पासून: तेलंगणा आणि पंजाब
अंतिम मतदार यादी प्रकाशन: 1 ऑक्टोबर 2026
1 ऑक्टोबर 2026 पासून: कर्नाटक, मेघालय, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली
अंतिम मतदार यादी प्रकाशन: 7 ऑक्टोबर 2026
1 ऑक्टोबर 2026 पासून: नागालँड
अंतिम मतदार यादी प्रकाशन: 22 नोव्हेंबर 2026
1 ऑक्टोबर 2026 पासून: त्रिपुरा
अंतिम मतदार यादी प्रकाशन: 23 डिसेंबर 2026

Exit mobile version