खराब काम केलं तर रगडल्याशिवाय राहणार नाही; पालखी मार्गाच्या कामावरून गडकरींचा कडक इशारा
लाखो वारकऱ्यांच्या भावनेचा आणि विश्वासाचा मार्ग आहे. त्यामुळे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज होणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
Gadkari’s warning to contractors : केंद्रीय मंत्रो नितीन गडकरी यांनी पंढरपूर पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांनी अत्यंत कठोर शब्दांत इशारा देत कामाच्या गुणवत्तेवबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मी क्वालिटीच्या बाबतीत भयंकर कडक आहे. ही जनतेची संपत्ती आहे आणि श्रद्धेचा विषय आहे. जर कुणी कामात हलगर्जीपणा केला किंवा खराब काम केलं, तर त्याला रागडल्याशिवाय राहणार नाही, असे ठाम शब्दांत गडकरी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पालखी मार्गाच्या कामात गुणवत्ता, सुरक्षितता आणि टिकाऊपणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासन आणि कंत्राटदारांपर्यंत पोहोचला आहे.
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत पायी प्रवास करतात. हा प्रवास केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अविभाज्य भाग मानला जातो. त्यामुळे हा मार्ग सामान्य महामार्ग नसून भावनेशी जोडलेला रस्ता आहे, असे सांगत गडकरी यांनी कामात निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
ही फक्त सिमेंट आणि डांबराची कामं नाहीत. हा लाखो वारकऱ्यांच्या भावनेचा आणि विश्वासाचा मार्ग आहे. त्यामुळे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज होणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले. खराब दर्जाचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना वारंवार साईट तपासणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
CM फडणवीस ‘बुलेट’ वरून विधानभवनात दाखल
पालखी कामाच्या कामाबाबत बोलताना गडकरी यांनी हे काम स्वतःसाठी भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील महत्वाचे असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पालखी मार्गाचे काम करण्याचे भाग्य मला मिळाले, असे ते म्हणाले. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांप्रती असलेली श्रद्धाच या प्रकल्पामागची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा 234 किलोमीटरचा असून त्यासाठी तब्बल 7,625 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. चार पॅकेजमध्ये विभागलेल्या या कामांपैकी दोन पॅकेज पूर्ण झाले आहेत, तर धरमपुरी ते लोणंद हा भाग 98 टक्के पूर्ण झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. दिवेघाट परिसरातील कामाची देखील त्यांनी पाहणी केली. या भागात सध्या 65 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील चार ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवेघाटाच्या कामासाठी अनेक वर्षे वन विभागाच्या परवानग्यांमुळे अडथळे निर्माण झाले होते. अखेर अडीच वर्षांच्या प्रयत्नांनंतर आवश्यक परवानग्या मिळाल्या आणि आता काम वेगाने सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. डिसेंबरपर्यंत हा टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला केंद्रस्थानी ठेऊन पालखी मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. यामध्ये वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरी विकास झाल्यामुळे नऊ पुलांची आवशक्यता निर्माण झाली असून थ्री व्हीलर आणि तू व्हीलर सहज जाऊ शकतील असे विशेष ब्रिज उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी इलेक्ट्रिक लिफ्टची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून वृद्ध वारकरी किंवा महिलांना अडचण येऊ नये.
समुद्राच्या मध्यभागी भारतीय मालवाहू जहाजावर पुन्हा हल्ला ! परराष्ट्र मंत्रालयाकडून थेट इशारा
तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम देखील वेगाने सुरू आहे. हा 130 किलोमीटरचा मार्ग तीन पॅकेजमध्ये विभागण्यात आला असून पाटास ते बारामती हा भाग पूर्ण झाला आहे. उर्वरित दोन भागांवर सध्या काम सुरू आहे. काही गावांना बायपास देण्यात आल्याने वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
या संपूर्ण प्रकल्पात पर्यावरण संवर्धनावर देखील विशेष भर देण्यात आला आहे. 46 तलाव बांधण्यात आले असून 33.45 लाख टन मातीचा वापर करण्यात आला आहे. मी रस्त्यांपेक्षा पाणी आणि शेतीच्या कामाला जास्त महत्व देतो, असे सांगत गडकरी यांनी जलसंधारणाच्या कमानीवर भर दिला. प्रकल्प परिसरात 40 हजार झाडे लावण्यात आली असून वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत परंपरेचा संदर्भ जपत वृक्षारोपण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जेजुरी येथे भाविकांसाठी फ्लायओव्हर उभारण्यात येणार असून तोंडले येथे दोन्ही पालखी मार्ग एकत्र येतात त्या ठिकणी देखील फ्लायओव्हरची उभारणी केली जाणार आहे. पुरंदर विमानतळासाठी एअरपोर्ट जंक्शन विकसित करण्याचा देखील विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडकर यांनी यावेळी स्वतःच्या आईची आठवण सांगताना भावनिक होत एक प्रसंग देखील सांगितला. आई मृत्यूपूर्वी पंढरपूर आणि गाणगापूरला गेली होती. तेव्हा तिने हा रास्ता किती खराब आहे असे म्हटले होते. त्यावेळी मी तिला संधी मिळाली तर हा रस्ता चांगला करेल असे सांगितले होते. आज विठ्ठलाच्या आशीर्वादाने तिची उच्च पूर्ण होत आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, हा पालखी मार्ग फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर पर्यटन, रोजगार आणि ग्रामीण विकासासाठी देखील महत्वाचा ठरणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. उत्तम रस्ते, हरित महामार्ग, पाणी संवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असे देखील त्यांनी सांगितले.