Download App

‘मासिक पाळी अपंगत्व नाही, त्यासाठी पगारी सुट्टीची गरज नाही’; स्मृती इराणींनी आळवला विरोधाचा सूर

Paid Menstrual Leave : महिलांच्या मासिक पाळीबाबत (Paid Menstrual Leave) केंद्रीय महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना सुट्टी देण्यासही त्यांनी विरोध व्यक्त केला. महिलांना येणारा मासिक पाळी म्हणजे काही अपंगत्व नाही. त्याची काही अडचणही नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही, असे स्मृती इराणी यांनी स्पष्ट शब्दांत राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मासिक पाळी स्वच्छता धोरणावर प्रश्न विचारला होता. त्यावर मंत्री इराणी यांनी उत्तर दिले. त्या पुढे म्हणाल्या, मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक भाग आहे. मासिक पाळी न येणाऱ्या व्यक्तीचा याबाबत विशिष्ट दृष्टीकोन असतो त्यामुळे महिलांना समान संधी नाकारल्या जातात अशा अर्थाने या समस्यांचा बाऊ करण्याची गरज नाही. (Union Minister smriti Irani Opposes Paid Menstrual Policy made Statement in Rajya Sabha)

मोदींनी आणि स्मृती इराणींनी मणिपूरला भेट द्यावी; DCW अध्यक्षा स्वाती मालीवाल स्पष्टच बोलल्या..

मागील आठवड्यात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना स्मृत इराणी म्हणाल्या, कार्यालयात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीसाठी भरपगारी सुट्टी देण्याचं धोरण आखण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. मासिक पाळीमुळे होणाऱ्या गंभीर समस्यांचा धोका असणाऱ्या महिलांची संख्या कमीच आहे. यातील अनेक समस्या या औषधांद्वारे नियंत्रित केल्या जाऊ शकतात.

मासिक पाळी स्वच्छता धोरणाचा एक मसुदा तयार करण्यात आला आहे. काही योजना सुरू केल्या जातील. या योजनांचा उद्देश मासिक पाळीसंदर्भात जनजागृती करण्याचाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत महिलांची सुरक्षा आणि सशक्तीकरणासाठी लागू करण्यात आलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश असून सध्या यावर भर दिला जात आहे.

Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात

Tags

follow us