मोदींनी आणि स्मृती इराणींनी मणिपूरला भेट द्यावी; DCW अध्यक्षा स्वाती मालीवाल स्पष्टच बोलल्या…

मोदींनी आणि स्मृती इराणींनी मणिपूरला भेट द्यावी; DCW अध्यक्षा स्वाती मालीवाल स्पष्टच बोलल्या…

Manipur violence : मणिपूर सरकार दोन समुदायांमधील हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करत असतांना बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ (Manipur Video) व्हायरल झाला. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले होत. देशातील जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये सुरू असलेली दंगल हा देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) आज मणिपूरमध्ये पोहोचल्या आहेत. (Swati Maliwal on pm narendra modi and smruti irani over Manipur violence)

मणिपूरमधील महिलांना विवस्त्र करून धिंड काढतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही मणिपूरला जाण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, त्यांना मणिपूर सरकारने मणिपूरला येण्याची परवानगी दिली नाही. तरीही त्या मणिपूरला गेल्या. यावेळी स्वाती मालीवाल म्हणाल्या की, मी येथे राजकारण करण्यासाठी आलेले नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना मणिपूरला भेट देण्याची विनंती करेन. मी येथे राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

मी थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाईन, मला मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना भेटायचे आहे. मला लैंगिक शोषणाच्या पीडितांनाही भेटायचे आहे आणि त्यांना कायदेशीर मदत, समुपदेशन किंवा काही भरपाई मिळाली आहे का? ते पाहायचे आहे. मी मणिपूर सरकारला आवाहन करते की, मी येथे फक्त राज्यातील लोकांना मदत करण्यासाठी आहे आणि कृपया मला तसे करण्याची परवानगी द्या, असंही दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube