Download App

तेलंगणात काँग्रेसचे ‘सोशल इंजिनीअरिंग’; दलित, महिला अन् अदिवासींना संधी

Telangana election 2023 : नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana election 2023) काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यानंतर काँग्रेसने रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार आज रेड्डी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर पार पडला. तेलंगणात स्थापन केलेल्या रेड्डी सरकारमध्ये काँग्रेसने ‘सोशल इंजिनीअरिंग’ प्रयोग केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अनुमुला रेवंत रेड्डी यांनी राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रेवंत रेड्डी यांच्यासह 11 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

तेलंगणामध्ये मुख्यमंत्र्यांसह 18 मंत्री होऊ शकतात
भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये दामोदर राजा नरसिंहा, उत्तम कुमार रेड्डी, कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी, सीताक्का, पोन्नम प्रभाकर, श्रीधर बाबू, तुम्माला नागेश्वर राव, कोंडा सुरेखा, जुपल्ली आणि कृष्णा पोंगुलेटी यांचा समावेश आहे. विधानसभा संख्याबळानुसार तेलंगणामध्ये मुख्यमंत्र्यांसह 18 मंत्री होऊ शकतात.

कोण आहेत शपथ घेणारे 12 मंत्री?
मल्लू भट्टी विक्रमार्क: विक्रमार्क हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी विरोधी पक्षनेते आहेत. अनुसूचित जातीतील माला समाजातील आहे. त्यांनी खम्मम जिल्ह्यातील काँग्रेसला 12 पैकी 11 जागा जिंकून दिल्या आहेत.

छ. संभाजीनगरच्या लेकाची गगनभरारी! समीर शाह BBC चे नवे अध्यक्ष, तीन दिवस काम अन् कोटींचा पगार

उत्तम कुमार रेड्डी : उत्तम कुमार रेड्डी यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. रेड्डी हे पक्षाचे निष्ठावंत आणि हवाई दलाचे माजी पायलट आहेत. त्यांनी आतापर्यंत सात वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. रेवंत रेड्डी यांच्या आधी ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. निवडणुकीपूर्वी ते तेलंगणातील नालगोंडा येथून पक्षाचे लोकसभा खासदार होते. ज्या जागेवरून त्यांनी राजीनामा दिला.

श्रीधर बाबू: काँग्रेसचे आणखी एक निष्ठावंत नेते आहेत. श्री बाबू हे पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते आणि ते ब्राह्मण समाजातून येतो. आता आमदार म्हणून त्यांचा पाचव्या कार्यकाळ आहे.

शेअर बाजारामधील तेजीला ब्रेक, तरीही गुंतवणूकदारांना 1.32 लाख कोटींचा नाफ

पोन्नम प्रभाकर: विद्यार्थीदशेपासूनच राजकारणी असलेले प्रभाकर करीमनगरचे माजी लोकसभा खासदार आहेत.ते मागासवर्गीय गौड समाजातील आहे. त्यांनी हुस्नाबादची जागा जिंकली.

कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी: कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी हे काँग्रेसचे लोकसभेचे खासदार होते. या निवडणुकीत त्यांना रिंगणात उतरवले होते. रेड्डी हे नलगोंडामधून निवडणूक जिंकली आहे.

दामोदर राजा नरसिंह: दामोदर राजा नरसिंह हे (अविभाजित) आंध्र प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण आणि कृषी मंत्रीही होते. ते तेलंगणातील मेडक भागातील दलित नेते आहेत. त्यांनी ऐडोले विधानसभेची जागा जिंकली.

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सभागृहात उपस्थित राहण्यासाठी खासदारांना व्हिप जारी

पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी: 2014 मध्ये आंध्र प्रदेशातील सत्ताधारी YSR काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर खम्मम लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ते 2018 मध्ये BRS मधून काँग्रेसमध्ये सामील झाले. जिल्ह्याचे ‘स्ट्राँगमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेड्डी यांनी पलायरूमधून 56,000 हून अधिक मतांनी विजय मिळवला.

दाना अनसूया: सीताक्का या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनसूया या मुलुग जिल्ह्यातील आदिवासी समुदायातून येतात. विशेष म्हणजे, राजकारणात येण्यापूर्वी अनसूया नक्षलवादी गटाच्या सदस्य होत्या. तरुण वयातच त्या नक्षलवादी चळवळीशी जोडल्या गेल्या होत्या. परंतु भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी शिक्षण घेतले आणि राज्यशास्त्रात पीएचडी केली. सध्या वकील आहेत. त्या मुलुग विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

थुम्माला नागेश्वर राव: याआधी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाऊ नायडू यांच्या टीडीपीसोबत होते. 2014 मध्ये BRS मध्ये सामील होण्यापूर्वी राव हे त्या पक्षाचे तीन वेळा आमदार होते. या निवडणुकीपूर्वी त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी बीआरएस सोडले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

महायुतीचा निवडणुकीआधीच डाव! हिवाळी अधिवेशनात 55 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

कोंडा सुरेखा: तेलंगणातील अनुभवी राजकारणी कोंडा सुरेखा यांनी वारंगल (पूर्व) विधानसभा निवडणूक जागा जिंकली. त्यांनी आठ वेळा निवडणूक लढवली होती. यापैकी फक्त दोनदा पराभूत झाल्या आहेत. त्या मागासवर्गीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मशाली समाजातून येतात.

जुपल्ली कृष्ण राव: जुपल्ली कृष्ण राव राजकारणात येण्यापूर्वी बँक कर्मचारी होते. 1999 पासून सलग पाच वेळा कोल्लापूर मधून निवडून आले आहेत. ते वेलामा जातीतून येतात.

Tags

follow us