छ. संभाजीनगरच्या लेकाची गगनभरारी! समीर शाह BBC चे नवे अध्यक्ष, तीन दिवस काम अन् कोटींचा पगार

छ. संभाजीनगरच्या लेकाची गगनभरारी! समीर शाह BBC चे नवे अध्यक्ष, तीन दिवस काम अन् कोटींचा पगार

छत्रपती संभाजीगर : भारतीय वंशाच्या समीर शाह (Sameer Shah) यांची बीबीसी अर्थात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC Media) अध्यक्षपदी निवड झाली आहे. बीबीसी ही ब्रिटन सरकारच्या मालकीची जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरातील विविध देशांमध्ये या संस्थेच्या कामाचे जाळे पसरले आहे. समीर शाह हे बीबीसीमध्ये सध्या ज्युनिपर कम्युनिकेशनचे सीईओ आहेत. अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना 1.67 कोटी रुपये वार्षिक पगार मिळणार आहे. विशेष म्हणजे ते आठवड्यातून तीनच दिवस काम करणार आहेत. (Sameer Shah of Indian origin has been elected as the chairman of BBC)

यापूर्वीचे बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांचे आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबतचे संभाषण लीक झाले होते. या प्रकरणात त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता त्यांच्या जागी समीर शाह यांची वर्णी लागली आहे. शाह यांच्या रुपाने अनेक वर्षांनंतर बीबीसीच्या शीर्षस्थानी एक पत्रकाराची निवड झाली आहे. शाह यांच्यावर आता बीबीसीच्या’माहिती, शिक्षण आणि मनोरंजन’ या ब्रीद वाक्याप्रमाणे संस्थेची पुढची वाटचाल करण्याची जबाबदारी असणार आहे. याशिवाय परवाना शुल्काबाबतही शहा यांना सरकारशी चर्चा करावी लागणार आहे.

Gurupatwant Singh Threat : ‘माझ्या हत्येचा कट फसला पण आता’.. पन्नूची संसदेवर हल्ल्याची धमकी

दरम्यान, बीबीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समीर शाह म्हणाले, ब्रिटिश नागरिकांच्या जीवनात बीबीसीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हे संस्थेचे कर्तव्य आहे. शाह यांनी यापूर्वी बीबीसीचे संचालक म्हणून काम केले आहे. राजकारण आणि चालू घडामोडींच्या बातम्यांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. 2019 मध्ये शाह यांना तत्कालिन क्वीन एलिझाबेथ यांनी प्रसारणातील सेवांसाठी ‘कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.

Sajid Mir : 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला पाकिस्तान जेलमध्येच दिलं विष…

छत्रपती संभाजीनगरध्ये जन्म :

आधीच्या औरंगाबाद आणि आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये समीर शाह यांचा 1952 मध्ये जन्म झाला. त्यांचे सर्वाधिक बालपणही इथेच गेले. 1960 साली ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले आहे आणि ते आता तिथे वांशिक विषयांवरील तज्ज्ञ आहेत. याशिवाय ते ब्रिटिश सरकारच्या वांशिक आणि वांशिक असमानता आयोगाच्या 2021 च्या अहवालाचे सह-लेखक होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube