Download App

अब चाँद पे पाँव जमाना है…! चांद्रयान-3 लॉन्चिंगपूर्वी ऑनलाईनच्या दुनियेत काय होतयं ट्रेन्ड

Chandrayan Mission 3 Launching : हार हो जाती है जब मान लिया जाता है! जीत तब होती है जब ठान लिया जाता है…. याच ओळींचा प्रत्यय आज प्रत्यक्षात येणार आहे. कारण अवघ्या काही तासात भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावणार आहे. मोहिमेबद्दल फक्त शास्त्रज्ञांनाच नाही प्रत्येक भारतीय नागरिकांला उत्सुकता असल्याचं पाहायाला मिळत आहे. मात्र, त्यापूर्वी याआधीचे चांद्रयान 2 च्यावेळी घडलेल्या गोष्टींना उजाळा देताना भारताच्या आजच्या मोहिमेला तेवढ्याच शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. ( Social Media Trending before Chandrayan Mission 3 Launching )

रॉकेटपासून ते चंद्रयान-3 पर्यंत का होत आहे तामिळनाडू कनेक्शनची चर्चा; जाणून घ्या

चार वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

4 वर्षांपूर्वीची ती हृदयस्पर्शी रात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी निराशा, इस्रोचे तत्कालीन अध्यक्षांचे पाणावलेले डोळे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढवलेला शास्त्रज्ञांचा उत्साह… हे सर्वकाही आज करोडो भारतीयांना आठवत आहे. कोणता भारतीय 6 सप्टेंबर 2019 ही तारीख विसरू शकतो. कारण अवघ्या दोन किमी अंतरावर असताना चांद्रयान 2 मोहीम अयशस्वी ठरली. मात्र, त्यानंतर आज पुन्हा भारताने हान न मानता भारताचे बाहुबली रॉकेट चांद्रयान-3 दुपारी 2.35 वाजता झेपावणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर #Chandrayaan3 ट्रेंड करत आहे.

Chandrayan 3 : थोड्याच वेळात चांद्रयान झेपावणार; सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या रितू करिधल नेमक्या कोण?

जुना व्हि़डिओ होतोय व्हायरल

चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगपूर्वी सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात के. सिवन यांचा आवाज ऐकू येत असून, चांद्रयान-2 शी संपर्क तुटल्याचे ते सांगत आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी सिवन यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांची पाठ थोपटत त्यांना गाळ्याशी लावत आहेत. हे दृश्य त्यावेळी ज्यांनी ज्यांनी पाहिले त्या सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. त्यावेळी मोदींनी ज्या पद्धतीने सर्व परिस्थिती हाताळली होती. त्याने उपस्थित सर्व शास्त्रज्ञांसह करोडो भारतीयामध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली होती. त्या दिवशी पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना जे सांगितले होते, ते आज संपूर्ण देश इस्रोला आपापल्या पद्धतीने सांगत आहे. ते म्हणजे भारत तुमच्यासोबत आहे.

आज भलेही सिवन निवृत्त झाले आहेत मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ते आजच्या दिवसाची वाट नक्कीच पाहत असतील. आज त्यांचे केस पांढरे झाले असतील, त्यांचा फोटो पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल पण आजही तोच विश्वास कायम असून, चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगपूर्वी त्यांची मुलाखत पाहून करोडो देशवासियांना हेच वाटले असणार की सिवन यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांद्रयान 3 पूर्णपणे तयार असून, आज देशभरात एकप्रकारे उत्सवाचे वातावरण आहे.

फोटोसह दिल्ली मेट्रोचे ट्वीट
दुसरीकडे चांद्रयान 3 च्या लाँन्चिंगपूर्वी दिल्ली मेट्रोकडून एका फोटोसह ट्विट करण्यात आले आहे. ज्यात पुढचं स्टेशन चंद्र असल्याचे दाखवण्यात आले आहे. चांद्रयान-3 मिशन आज दुपारी लॉन्च झाल्यानंतर काही काळ पृथ्वीच्या कक्षे फिरत राहिल. त्यानंतर ते पुढे चंद्राच्या कक्षेकडे मार्गक्रमण करत 23-24 ऑगस्ट दरम्यान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल.

हम होंगे कामयाब…
जीवनात प्रत्येक पावलावर चढ-उतार येतच राहतील. आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस असून, Hope for the best. या युक्तीप्रमाणेच आपल्यापैकी अनेकजण पुढे मार्गक्रमण करत काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असून, हिम्मत के साथ चले हे पंतप्रधान मोदींचे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत भारत हेच सांगत आहे की, पूरा होगा ख्वाब, हम होंगे कामयाब।

Tags

follow us