Download App

अवघ्या दोन महिन्यांनी होणार होते विवाहबद्ध; जम्मूमध्ये स्फोटात दोन जवान शहीद!

Soldiers Martyred सीमेवरून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोन जवान शहीद झाले एप्रिलमध्ये या दोघांचीही विवाह पार पडणार होता.

  • Written By: Last Updated:

Soldiers Martyred on LOC will getting married in April : सीमेवरून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. जम्मू-कश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LOC) मंगळवारी 11 फेब्रुवारीला संशयित दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. त्याहून ही दुर्दैवी म्हणजे एप्रिलमध्ये या दोघांचीही विवाह पार पडणार होता. मात्र दोन महिन्यांअगोदरच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दोघांच्याही घरी अत्यंक शोक पसरला आहे.

ट्रम्प यांचा दणका.. कंगाल झाले शेअर बाजारातील महारथी, 40 दिवसात बुडाले हजारो करोडो रुपये

संशयित दहशतवाद्यांकडून आयईडी स्फोट करण्यात आले होते. यामध्ये कॅप्टन करमजीत सिंह बक्षी आणि नायक मुकेश या दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामधील नायक मुकेश सिंह हे जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील होते. तर कॅप्टन करमजीत सिंह बक्षी हे जम्मूमधीलच सैनिक कॉलनीतील राहणारे होते. एप्रिल महिन्यात 18 तारखेला या दोघांचा विवाह पार पडणार होता.

‘राज्यातील मदरसे शैक्षणिक संस्था आहेत की अतिरेक्यांचे अड्डे…’; मंत्री नितेश राणेंचा सवाल

त्यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू होती. घरी अत्यंत आनंदाचं वातावरण होतं. मुकेश सिंह यांचे वडील जम्मू-कश्मीर पोलीसमध्ये होते. ते आता निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबात एक भाऊ आहे. तो देखीील भारतीय सैन्यात आहे. दोन बहिणी विवाहीत आहेत. त्यामुळे ज्या घरी त्यांच्या विवाहाची तयारी सुरू होती. तेथे अचानक दु:खाच वातावरण पसरलं आहे.

अखेर राजन साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र! उपनेते पदाचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार

माहितीनुसार, दोन्ही सैनिकांची प्रकृती गंभीर होती. त्यांना उपचारांसाठी विमानाने हलवण्यात आले होते मात्र दोन्ही जवान शहीद झाले. शहीद सैनिकांमध्ये कॅप्टन केएस बक्षी आणि शिपाई मुकेश यांचा समावेश आहे. सीमा गस्त घालत असताना अखनूर सेक्टरमधील लालेली येथे झालेल्या स्फोटात दोन्ही सैनिक शहीद झाले. या घटनेनंतर लष्कराचे जवान परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. या संदर्भात माहिती देताना लष्कराने म्हटले आहे की, व्हाईट नाईट कॉर्प्स दोन शूर सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करते आणि श्रद्धांजली अर्पण करते.

follow us