Sonia Gandhi Vande Mataram Controversy : काँग्रेसच्या मुख्यालयात आज स्वातंत्र्यदिनी सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी वंदे मातरम गाण्यापासून रोखलं, असा आरोप होत आहे. नवीन शासन नियमानुसार वंदे मातरम (Vande Mataram) गाणे हे अनिवार्य असताना सोनिया गांधींनी वंदे मातरम गाण्यापासून का रोखलं ? असा सवालही भाजपा प्रवक्ते आर.पी.सिंह यांनी उपस्थित केला. वंदे मातरम गायणाच्या वेळी सोनिया गांधी कथितपणे नाराज झाल्या, तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांकेतिक इशारा करुन गाण्यापासून रोखले असे आरोप आर. पी. सिंह यांनी सोशल मीडियावरुन केलेत. त्या आरोपांवर काँग्रेस नेते जयराम रमेश आणि काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी उत्तर दिले.
Glad people have the full video before these criminals deleted it.
Look at how Sonia gets rattled after first two stanzas of Vande Matram – literally pressuring to shut it down.
This is all being done to appease a vote bank, who had a veto on our polity, even after partition. pic.twitter.com/vt51hhAFBy
— Viktor (@desishitposterr) August 15, 2026
कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही ; शिवसेना-धनुष्यबाण शिंदेंचाच; संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
1937 पासून वंदे मातरम गाण्याची परंपरा
काँग्रेस भवनात वंदे मातरम गाताना कोणताही व्यत्यय आलेला नव्हता. उलट 1937 पासून काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, पंडीत जवाहरलाल नेहरु आणि गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार वंदे मातरम काँग्रेस अधिवेशनात गाण्याची परंपरा आहे. त्यामुळे वंदे मातरम गाण्यापासून रोखलं हा आरोप खोटा आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले.
देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी, ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार
वंदे मातरम गायल्याने नाराज होणं हा दिमागी नक्षलवाद
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या मुद्यावर बोलले. बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला पण यांच्या डोक्यात दिमागी नक्षलवाद आहे, ती अराजकता आहे. ती अरजकता काँग्रेस भवनात आज दिसून आली. वंदे मातरम संपुर्ण देशात गायलं पाहीजे असा शासन आदेश असताना पुर्ण वंदे मातरम गायल्यामुळे सोनिया गांधी नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा दिमागी नक्षलवाद आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या पाहायला मिळतायत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे?@Dev_Fadnavis#soniagandhi #congress #devendrafadnavis #IndependenceDay #IndiaIndependenceDay #maharashtra #JaiHind pic.twitter.com/qpn7mr2GD1
— I Support Devendra (@DevendraForCM) August 15, 2026
