Sonia Gandhi : बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहून दिल्लीला परतणाऱ्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. फ्लाइटमधील तांत्रिक बिघाडामुळे भोपाळमधील राजा भोज विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांचा विमानातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधींनी फोटोसह इंस्टाग्रामवर लिहिले, ‘आई, कठीण परिस्थितीतही खूप संयमी.’
आई म्हणजे कठीण परिस्थितीतही संयमी
खरं तर, बुधवारी राहुल यांनी इमर्जन्सी लँडिंग करणाऱ्या विमानातील आई सोनिया गांधी यांचा फोटो शेअर केला होता. सोनिया गांधी यांनी चार्टर्ड विमानात त्यांच्या सीटवर आपत्कालीन ऑक्सिजन मास्क घातलेला आहे. राहुल गांधींनी फोटोसह इंस्टाग्रामवर लिहिले, ‘आई, कठीण परिस्थितीतही खूप संयमी.
दरम्यान, विमानतळ अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते नॉन शेड्यूल्ड फ्लाइटने दिल्लीला जात होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला रात्री आठच्या सुमारास भोपाळमध्ये उतरावे लागले. ही माहिती मिळताच काँग्रेसचे काही नेते विमानतळावर पोहोचले. या नेत्यांनी राहुल गांधी आणि सोनिय गांधींची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेते भोपाळहून इंडिगोच्या विमानाने दिल्लीला रवाना झाले.
आई IAS अधिकारी, बाळ शिकतंय अंगणवाडीत, जालन्याच्या सीईओंचा नवा आदर्श
यादरम्यान दोन्ही केंद्रीय नेते भोपाळ विमानतळावर दीड तास थांबले होते. याआधी दोन्ही नेते मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी मंगळवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत 26 विरोधी पक्ष सहभागी होते.