Download App

सपा नेते आझम खान यांंना मुलगा आणि पत्नीसह 7 वर्षांची शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?

Azam Khan : यूपीचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान (Azam Khan), त्यांची पत्नी डॉ. ताजीन फातमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना रामपूर (एमपी-एमएलए) न्यायालयाने प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे तिघेही आज कोर्टातून थेट तुरुंगात जाणार आहेत. हे प्रकरण अब्दुल्ला आझम खान यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांशी संबंधित आहे.

भाजप नेते आकाश सक्सेना यांनी 2019 मध्ये हा खटला दाखल केला होता. सरकारी वकील अरुण कुमार यांनी सांगितले की, आझम खान यांच्या जन्म प्रमाणपत्राच्या दोन प्रकरणांमध्ये तिघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्दुल्ला आझम विरुद्ध गंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना आरोपी करण्यात आले आहे.

आझम खान यांच्याकडे दोन जन्म प्रमाणपत्र
त्यांनी सांगितले की, या प्रकरणात अब्दुल्ला आझम यांच्याकडे दोन जन्म प्रमाणपत्र असल्याचा आरोप आहे, त्यापैकी एक लखनऊ नगरपालिकेकडून जानेवारी 2015 मध्ये बनवले गेले होते आणि दुसरे रामपूरचे आहे, जे 28 जून 2012 रोजी रामपूर नगरपालिकेतून बनवले गेले आहे. या जन्म दाखल्यांचा वेळोवेळी सोयीनुसार वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

NCP च्या दोन्ही गटाकडून 5 राज्यांच्या निवडणुका न लढण्याचा निर्णय, नेमकं कारणं तरी काय?

अब्दुल्ला आझम खान यांच्यावर पहिल्या जन्म प्रमाणपत्राच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेश दौरे करण्याचा आणि दुसऱ्या प्रमाणपत्राचा सरकारी कामांसाठी वापर केल्याचा आरोप आहे. ही दोन्ही प्रमाणपत्रे फसव्या पद्धतीने आणि पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून देण्यात आली होती. भाजप नेत्याच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags

follow us