Wrestlers Protest : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातील कुस्तीपटूंच्या सुरु असलेल्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. शनिवारी (3 जून) रात्री उशीरा या खेळाडूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान, यानंतर खेळाडूंनी आंदोलन मागे घेतले असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिकने या आंदोलनामधून माघार घेतली असून ती रेल्वेतील नोकरीवर परतली असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
मात्र, साक्षी मलिकने तात्काळ ट्विट करून या वृत्तांचे खंडन केले आहे. तिने लिहिले – ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आम्ही कोणीही मागे हटलो नाही आणि हटणारही नाही. आंदोलनासोबतच मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका.
https://twitter.com/SakshiMalik/status/1665645066105544705?s=20
वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली
2021 टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट हे ब्रिज भूषण यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे प्रमुख चेहरे आहेत. तिघेही रेल्वेत नोकरीवर परतले आहेत. यानंतर तिघांनीही आंदोलनातून माघार घेतल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यात साक्षीचे नाव सर्वात आधी आले होते. मात्र यानंतर साक्षीने ट्विट करून या वृत्ताचे खंडन केले आहे. न्यायासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे साक्षीने सांगितले.
आंदोलन वापस लेने की खबरें कोरी अफ़वाह हैं. ये खबरें हमें नुक़सान पहुँचाने के लिए फैलाई जा रही हैं.
हम न पीछे हटे हैं और न ही हमने आंदोलन वापस लिया है. महिला पहलवानों की एफ़आईआर उठाने की खबर भी झूठी है.
इंसाफ़ मिलने तक लड़ाई जारी रहेगी 🙏🏼 #WrestlerProtest pic.twitter.com/utShj583VZ
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) June 5, 2023
साक्षीनंतर बजरंगनेही ट्विट करून ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले – आंदोलन मागे घेतल्याच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत. आमचे नुकसान करण्यासाठी या बातम्या पसरवल्या जात आहेत. आम्ही मागे हटलो नाही आणि आंदोलन मागे घेतले नाही. महिला कुस्तीपटूंनी एफआयआर मागे घेतल्याच्या बातम्याही खोट्या आहेत. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. साक्षी, बजरंग आणि विनेश रेल्वेत नोकरीवर परतले असले तरी न्यायासाठी त्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कुस्तीपटूंच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे.