SS retail IPO खुला: अँकर इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद, 146 कोटींची गुंतवणूक

SS Retail Limited IPO : भारतीय शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा SS Retail चा आयपीओ आजपासून (16 सप्टेंबर) खुला झाला

SS Retail Limited IPO

SS Retail Limited IPO

SS Retail Limited IPO : भारतीय शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा SS Retail चा आयपीओ आजपासून (16 सप्टेंबर) खुला झाला असून गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची एक चांगली संधी घेऊन आला आहे. जर तुम्ही देखील या आयपीओमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या आयपीओमध्ये 18 सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे.  सध्या या आयपीओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे. माहितीनुसार, कंपनीने आयपीओपूर्वीच अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे 146 कोटी उभारले असून, देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा यात मोठा सहभाग आहे.

11 म्युच्युअल फंडांच्या 19 योजनांचा सहभाग

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अँकर बुकमध्ये SBI Mutual Fund, ICICI Prudential Mutual Fund, Kotak Mahindra AMC, Axis Mutual Fund, WhiteOak Capital, Motilal Oswal AMC, Invesco आणि Aditya Birla Sun Life AMC यांसह 11 देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी सहभाग घेतला. या फंडांनी अँकर बुकमधील सुमारे 83.14% शेअर्स घेतले आहे.

 SS Retail कंपनीबद्दल जाणून घ्या 

SS Retail ही मोबाईल फोन, अ‍ॅक्सेसरीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मल्टी-ब्रँड रिटेल चेन आहे. कंपनीचे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये 536 स्टोअर्स आहेत. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचा महसूल सुमारे  2,351 कोटी रुपये होता तर नफा सुमारे 59.8 कोटी होता.

आयपीओमधील निधी कुठे वापरणार? 

कंपनीच्या माहितीनुसार, आयपीओमधून मिळणाऱ्या निधीपैकी सुमारे 241.3 कोटी भांडवलसाठी (incremental working capital) आणि सुमारे 12.4 कोटी नवीन स्टोअर्सच्या फिट आऊट (fit-out) खर्चासाठी वापरण्याचे नियोजन आहे. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाणार आहे.

 एसएस रिटेलचा 500 कोटींचा आयपीओ

-एकूण आयपीओ: 500 कोटी
-नवीन शेअर विक्री: 360 कोटी
-शेअर विक्रीतून निधी: ₹140 कोटी
– शेअरची किंमत: 403 ते 424
– एका लॉटमध्ये: 35 शेअर
-किमान गुंतवणूक: 14,840
– आयपीओची मुदत: 16 ते 18 सप्टेंबर 2026
– संभाव्य शेअर बाजारातील नोंदणी: 23 सप्टेंबर 2026

आगरकरांची मुख्य निवडकर्ता म्हणून शेवटची बैठक; रोहित शर्मा अन् विराट कोहलीबाबत होणार मोठा निर्णय? –

 किती गुंतवणूक करावी लागणार?

किमान एका लॉटसाठी 35 शेअर घ्यावे लागतील. कमाल किंमत 424 धरल्यास एका लॉटसाठी 14,840 गुंतवावे लागतील.

Exit mobile version