Maha Kumbh 2025 : प्रयागराज येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात (Maha Kumbh 2025) अँपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स (Lauren Powell Jobs) यांनी देखील हजेरी लावली आहे. गुरू स्वामी कैलाशानंद यांनी लॉरेन यांना कमला असं नवीन दिले आहे. लॉरेन यांनी कालच जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यात संगमात स्नान केले होते.
तर दुसरीकडे स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिले एक पत्र व्हायरल झाले आहे. त्यांनी 1974 मध्ये कुंभमेळ्यासाठी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. असं या पत्रात लिहिले आहे. तर आता हे पत्र बोनहॅम्सने $500,312 (4.32 कोटी रुपये) मध्ये लिलाव करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिले पत्र त्यांच्या आध्यात्मिक आणि काव्यात्मक बाजूची दुर्मिळ झलक देते. असा दावा मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात येत आहे.
स्टीव्ह जॉब्स यांनी हे पत्र त्यांच्या बालपणीचा मित्र टिम ब्राउनला त्याच्या 19 व्या वाढदिवशी लिहिले होते. माहितीनुसार, हे पत्र स्टीव्ह जॉब्सने स्टीव्ह वोझ्नियाकसोबत अॅपलची स्थापना करण्याच्या फक्त दोन वर्षांपूर्वी लिहिले होते. या पत्रात त्यांनी भारतात होणाऱ्या कुंभमेळाव्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मीडिया रिपोर्टसनुसार 2025 मध्ये होत असलेल्या कुंभमेळाव्यात लॉरेन पॉवेल जॉब्स फक्त त्यांच्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आल्या आहेत.
नेमकं पत्रात काय लिहिले होते?
या पत्रात स्टीव्ह जॉब्सने अनेक वेळा रडण्याचा उल्लेखही केला होता. त्यांनी लिहिले होते की, ‘मला भारतात जायचे आहे. मला तिथे आयोजित कुंभमेळ्यात सहभागी व्हायचे आहे. एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मी मार्चमध्ये कधीतरी जाणार आहे. तथापि, मला त्याबद्दल खात्री नाही. असं त्यांनी लिहिले होते.
लॉरेन पॉवेल जॉब्सने केला संगमात प्रवेश
तर दुसरीकडे लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी काल जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यात संगमात स्नान केले होते. याबाबत पंचायती आखाड्याचे महंत रवींद्र पुरी श्री निरंजनी यांनी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, लॉरेनला येथे ‘कमला’ हे नवीन नाव मिळाले आहे. कमला नाव खूप साधा, नम्र आणि अहंकारमुक्त आहे आणि येथील सनातनी संस्कृतीचा त्याच्यावर खोलवर प्रभाव आहे. असं महंत रवींद्र पुरी श्री निरंजनी म्हणाले.
रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जाणार? BCCI चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
पुढे बोलताना महंत रवींद्र पुरी श्री निरंजनी म्हणाले की, अमृत स्नान करण्यासाठी संगम घाटावर कमला आली आहे आणि ती सध्या धावणीत आहे. गर्दीत असल्याने तिला काही समस्या येत आहेत, म्हणून ती कॅम्पमध्ये आराम करत आहे. ती खूप साधी आणि सहज स्वभावाची आहे आणि तिला सनातन धर्माबद्दल जाणून घ्यायचे आहे. तिला गुरुबद्दल जाणून घ्यायचे आहे, तिचे हजारो प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. सर्व प्रश्न सनातनशी संबंधित आहेत. असं देखील यावेळी महंत रवींद्र पुरी श्री निरंजनी म्हणाले.