मोठी बातमी! महाकुंभात अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी होणार सहभागी
Steve Jobs wife will participate in Mahakumbh Mela 2025 : प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 रोजीपासून महाकुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येतील, असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs), यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या देखील महाकुंभ मेळा 2025 (Mahakumbh Mela 2025) मध्ये सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत. त्या निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात मुक्काम करणार आहेत.
बुलढाण्यात टक्कल व्हायरस बाधित वाढले; तपासणीतून आजाराचं कारणही सापडलं..
2025 च्या या महाकुंभमेळ्यात अनेक VIP, VVIP, करोडपती, संत-महंत, ऋषी-मुनी सहभागी होत आहेत. 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मेळाला कोट्यवधी लोक हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे ॲपलचे दिवंगत प्रमुख स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल (Laurene Powell) याही या मेळ्यात सहभागी होऊन महाकुंभ मेळ्यात संन्यासी आयुष्य देखील जगणार आहेत.
शरद पवारांचा गट सत्तेत जाणार? स्वतःच खुलासा करत म्हणाले, “पुढील 15 दिवसांत..”
कल्पवास ही हिंदू परंपरेतील एक प्राचीन प्रथा आहे. ज्याला कल्पवासी किंवा कल्पवसिष्ठ म्हणतात. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो. कल्पवासी दररोज गंगेत स्नान करतात. कुंभमेळ्यात (Mahakumbh Mela) धार्मिक प्रवचन ऐकण्यासाठी आणि भजन-कीर्तनात सहभागी होण्यासाठी विविध तत्त्वज्ञ आणि संतांच्या शिबिरांना भेट देतात. स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या निरंजनी आखाड्याच्या ‘महामंडलेश्वर’ स्वामी कल्याणानंद यांच्या शिबिरात राहतील.
प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. लोक या महामेळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. 12 वर्षांतून एकदा होणाऱ्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. या मेळ्यात अनेक नामवंत व्यक्तीही सहभागी होणार आहेत. याशिवाय यावेळी देश-विदेशातील श्रीमंत महिलाही श्रद्धेने संगमात स्नान करण्यासाठी येत आहेत. ज्यामध्ये अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स, इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापक सुधा मूर्ती आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री देवी जिंदाल यांचा समावेश आहे.