Share Market Crash : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील भारतीय शेअर बाजारात घसरल्याने गुंतवणूकदारांना मोठा नुकसान सहन करावा लागला आहे.
आज 31 ऑक्टोबर 2024 रोजी NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 553 अंकांनी घसरून 79,389.06 वर बंद झाला. तर निफ्टी 50 देखील 135.50 अंकांनी घसरली आणि 24,205.35 अंकांवर बंद झाली तर आज सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात देखील घसरणीसह झाली. आज बाजारात मोठ्या प्रमाणात आयटी शेअर्सना मोठा फटका बसला आहे. माहितीनुसार आज बाजारात आयटी शेअर्सनी एकूण 3.67 टक्क्यांची घसरण नोंदवली.
लवकरच येणार HDB IPO
तर दुसरीकडे एचडीएफसी बँकेची उपकंपनी असलेल्या HDB फायनान्शियल सर्व्हिसेसने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणेजच IPO द्वारे 12,500 कोटी रुपये उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत.
‘मी माफी मागते’, उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागेल, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
बुधवारी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, प्रस्तावित IPO हा रु. 2,500 कोटी किमतीच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि प्रवर्तक HDFC द्वारे रु. 10,000 कोटी किमतीच्या ऑफर फॉर सेल (OFS) यांचे मिश्रण आहे. सध्या एचडीएफसी बँकेची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) शाखा असलेल्या HDB फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 94.36 टक्के हिस्सेदारी आहे.
महायुतीची सदा सरवणकरांना मोठी ऑफर, अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा होणार?