Download App

शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स आहेत तेजीत?

सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात आयटी आणि ऑटो निर्देशांकांत मोठी वाढ झाली. एफएमसीजी आणि रिअल्टी निर्देशांक

  • Written By: Last Updated:

Stock Market Opening : देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह आज बुधवार (29 जानेवारी)रोजी उघडले. (Stock Market) सेन्सेक्स 237 अंकांनी वाढून 76,138 वर उघडला. निफ्टी 69 अंकांनी वाढून 23,026 वर तर बँक निफ्टी 131 अंकांनी वाढून 48,997 वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात आयटी आणि ऑटो निर्देशांकांत मोठी वाढ झाली. एफएमसीजी आणि रिअल्टी निर्देशांक घसरत होते.

रिअल इस्टेट क्षेत्रात केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणांची शक्यता; अर्थसंकल्पानंतर घरंही होतील स्वस्त

निफ्टीमध्ये 93 अंकांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामध्ये तेजीचं वातावरण दिसत आहे. शेअर बाजारातील तेजीमुळं साधारणपणे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईवरील लिस्टेड असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 414 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील 2975 शेअरच्या ट्रेडिंग पैकी 2162 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. तर 699 शेअरमध्ये घसरण झाली. 100 स्टॉक्सला लोअर सर्किट लागलं तर 63 कंपन्यांच्या स्टॉक्सला अप्पर सर्किट लागलं. सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी 19 स्टॉक्स तेजी तर 11 स्टॉक्समध्ये घसरण झालेली दिसून आली. तेजी असणाऱ्या शेअरमध्ये इन्फोसिस झोमॅटो, टिसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा स्टील यांचा समावेश आहे. तर, नेस्ले, एचयूएल, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, आयटीसी आणि भारती एअरटेलच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली.

भारतीय शेअर बाजारासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्सच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स 870 अंकांच्या तेजीसह 52350 अंकांवर पोहोचला. निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स 300 अंकांनी वाढून 16331 वर पोहोचला आहे. याशिवाय बाजारत तेजी असल्यानं माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी आयटी इंडेक्स 800 अंकांनी वाढला आहे.

 

follow us