Stock Market : फक्त ३ रुपयांना असलेल्या शेअरची किंमत २ लाख ३६ हजार, ‘MRF’ चं मोडलं रेकॉर्ड

  • Written By: Published:
Stock Market : फक्त ३ रुपयांना असलेल्या शेअरची किंमत २ लाख ३६ हजार, ‘MRF’ चं मोडलं रेकॉर्ड

lcid Investments Share Price:  : सर्वात महागडा शेअर म्हणून ज्याची शेअर (Stocks) बाजारामध्ये ओळख आहे, त्या एमआरएफ कंपनीचं रेकॉर्ड दुसऱ्या एका कंपनीने मोडलं आहे. ज्या कंपनीचा शेअर जुलै महिन्यात एक पेन्नी स्टॉक होता आणि त्याची किंमत केवळ तीन रुपये होती, तो शेअर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तब्बल २ लाख ३६ हजार रुपयांवर गेला आहे.

या कंपनीचं नाव आहे एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड. जुलै महिन्यामध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ३.२१ रुपये होती. त्याकडे केवळ एक पेन्नी स्टॉक म्हणून बघितलं जात होतं. काल बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर दुसऱ्यांदा लिस्ट झाला. या शेअरची लिस्टिंग किंमत २ लाख २५ हजार रुपये इतकी होती. परंतु, ट्रेडिंगदरम्यान शेअरने तब्बल ५ टक्क्यांनी उसळी मारली आणि शेअरची किंमत तब्बल २ लाख ३६ हजार २५० रुपये इतकी झाली. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी बीएसईने एक सर्क्युलर काढून निवडक गुंतवणुकदार कंपन्यांना पुन्हा यादीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. एल्सिड इन्व्हेस्टमेंट त्यापैकीच एक कंपनी होती. त्यानंतर मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी प्रभावी दर निश्चित करण्यात आले.

Petrol Price : दिवाळीत आली खास बातमी! पेट्रोल अन् डिझेल स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

एल्सिड इन्व्हेसमेंट या कंपनीसह नलवा सन्स इन्व्हेस्टमेंट, टीव्हीएस होल्डिंग्ज, कल्याणी इन्व्हेंस्टमेंट, एलआयसी इन्व्हेस्टमेंट, महाराष्ट्र स्कूटर्स, जीएफएल, हरियाणा कॅपफिन आणि पिलानी इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज कार्पोरेशन या कंपन्यांचाही लिस्टिंमध्ये समावेश आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये २.९५ टक्के भागभांडवल आहे. ज्याची किंमत ८ हजार ५०० कोटी रुपये इतकी आहे. याच कारणामुळे कंपनीच्या शेअरची किंमत वाढल्याचं जाणकार सांगतात.

दुसरीकडे एल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या प्रवर्तकांनी १ लाख ६१ हजार २३ रुपये या किंमतीवर डिलिस्टिंगचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु हा प्रस्ताव अयशस्वी ठरला. मात्र शेअरने दोन-तीन रुपयांवरुन थेट २ लाख ३६ हजार रुपयांवर उसळी मारल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube