शेअर बाजार मोठी उसळी! Nifty पहिल्यांदाच २५००० पार; वाचा, कोणते शेअर्स असतील तेजीत?
Share Market Today : भारतीय बेंचमार्क इंडेक्स बुधवारी सलग चौथ्या सत्रात वाढीसह बंद झाले. (Sensex) देशांतर्गत शेअर बाजाराचा बेंचमार्क सेन्सेक्सनं ८२ हजारांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीनं २५ हजारांचा टप्पा ओलांडला. आज शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला. आयटी वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत.
Video: वर्ष झालं नाही तोच संसदेच्या नव्या इमारतीला गळती, प्रवेशद्वारामध्येही पाणी, व्हिडिओ व्हायरल
मोठी वाढ
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल दिसून येत आहे. एकंदरीत आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.६४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.६४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स कामकाजादरम्यान १९०.३० अंकांनी वधारून ८१,९३१.६४ वर आणि निफ्टी ५० ७४.८५ अंकांनी म्हणजे ०.३० टक्क्यांनी वधारून २५,०२६.०० वर होता. एका दिवसापूर्वी सेन्सेक्स ७२१०१.६९ वर आणि निफ्टी २१८३९.१० वर बंद झाला होता.
संपत्तीत १.६४ लाख कोटींची वाढ
एका दिवसापूर्वी म्हणजेच ३१ जुलै २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप ४,६२,३८,००८.३५ कोटी रुपये होतं. आज १ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,६४,०२,९८६.६२ कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १,६४,९७८.२७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
राहुल गांधींना झटका! वादग्रस्त भाषणातील त्या चार शब्दांना अखेर कात्री
२२ शेअर ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २२ शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. मारुती सुझुकी, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा मोटर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक आणि इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक घसरले. पॉवरग्रिड, जेएसडब्ल्यू, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय बँक, इंडसइंड बँक, टायटन, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल या कंपन्यांचेही शेअर्स वधारले.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
- मारुती (MARUTI)
- जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
- एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
- एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)
- एनटीपीसी (NTPC)
- ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)
- लुपिन लिमिटेड (LUPIN)
- पॉलीकॅब (POLYCAB)
- ऑरोफार्मा (AUROPHARMA)
- एमआरएफ (MRF)
नोंद – क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.