राहुल गांधींना झटका! वादग्रस्त भाषणातील ‘त्या’ चार शब्दांना अखेर कात्री

राहुल गांधींना झटका! वादग्रस्त भाषणातील ‘त्या’ चार शब्दांना अखेर कात्री

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं (Rahul Gandhi) एक भाषण चांगलंच वादग्रस्त ठरलं आहे. सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान (Budget Session) त्यांनी दिलेल्या भाषणातून चार शब्द वगळण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांचे संसदेतील (Lok Sabha Speech) दुसरच भाषण होतं. याआधी त्यांनी 1 जुलै रोजी पहिलं भाषण दिलं होतं. या भाषणाचेही काही भाग रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले होते.

आता राहुल गांधी यांचं दुसरं भाषणही वादात सापडलं आहे. या भाषणातील काही शब्द वगळण्यात आले आहेत. या भाषणातील मोहन भागवत, अजित डोभाळ, अंबानी आणि अदानी (Gautam Adani) या चार शब्दांना वगळण्यात आले आहे. राहुल गांधींनी आपल्या पाऊण तासांच्या भाषणात या चार जणांची नावं घेतली होती. यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी (Om Birla) तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Rahul Gandhi यांचा मोठा दावा; एनडीएचे काही लोक आमच्या संपर्कात, छोटी चूकही सरकार पाडू शकते

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी या भाषणात महाभारताच्या युद्धातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. यामध्ये भीती, हिंसा आहे आणि अभिमन्यूला फसवून सहा लोकांनी मारलं. त्यांनी चक्रव्यूहाला पद्मव्यूह संबोधून हे उलट्या कमळासारखे असते असे सांगितले. नवीन चक्रव्यूह तयार झालं आहे. चक्रव्यूह लोटस आकारात आहे. ज्याला आजकाल मोदी छातीवर लावून फिरत असतात. अभिमन्यूला सहा लोकांनी मारलं होतं. ज्यांची नावं द्रोण, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि शुकनी होती. आज ही चक्रव्युहाच्या मधोमध सहा लोक आहेत. सहा लोक कंट्रोल करत आहेत. जसे त्या काळात सहा लोक कंट्रोल करत होते तसेच आताही सहा लोक कंट्रोल करत आहेत.

यानंतर ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना हटकले आणि सांगितले की ज्या व्यक्ती या सदनाच्या सदस्य नाहीत त्यांची नावं घेऊ नका. यावर राहुल गांधी म्हणाले त्यांना वाटत असेल की अजित डोवाल, अदानी आणि अंबानी यांची नावं घेऊ नये तर ते घेणार नाही. यानंतर त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारने देशातील जनतेला एका चक्रव्युहात अडकवलं आहे. यामध्ये शेतकरी आणि युवक सर्वाधिक त्रासलेले आहेत.

भाजपने जनतेला अभिमन्यूसारख चक्रव्यूहात अडकवलं, मोदी-शाह-अदानींचं नाव घेत राहुल गांधींचे टीकास्त्र

follow us
  • fb
  • instagram
  • youtube