भाजपने जनतेला अभिमन्यूसारख चक्रव्यूहात अडकवलं, मोदी-शाह-अदानींचं नाव घेत राहुल गांधींचे टीकास्त्र
Rahul Gandhi : आज अर्थसंकल्पावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राहुल गांधींनी (Narendra Modi) भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. भाजपने चक्रव्यूह तयार केला असून त्यात देशातील जनतेला अडकवले. ते ‘चक्रव्यूह’, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सहा लोक चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी सगळे पुरावे द्यावेत; फडणवीस-देशमुख वादात पटोलेंची उडी
आज लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात, सहा जणांनी अभिमन्यूला ‘चक्रव्यूह’मध्ये अडकवून मारलं. आज एकविसाव्या शतकातही एक चक्रव्यूह तयार केलं आहे. या चक्रव्यूहाचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे. त्याचे चिन्ह पंतप्रधान मोदी आपल्या छातीवर लावून फिरतात. जे अभिमन्यू बरोबर करण्यात आलं, तेच आज देशातील जनतेबरोबर केलं जात आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
Video : सीतारामन पहिल्या हसल्या मग डोक्याला हात लावला; लोकसभेत नेमकं काय घडलं?
पुढं बोलतांना ते म्हणाले, अभिमन्यूप्रमाणे भारतातील लोकांना अडकवलं आहे. देशातील तरुण, शेतकरी, महिला, छोटे व्यापारी चक्रव्यूहात अडकले आहेत. लाखो लोकांना रोजगार देणारे लघुउद्योग चक्रव्यूहात अडकले आहेत. लोक जीएसटी, नोटाबंदी आणि कर आतांकवादाचा शिकार झाले. त्याला रोखण्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही, अशी टीकाही राहुल यांनी केली.
ज्याप्रमाणे अभिमन्यूला सहा जणांनी चक्रव्यूहात अडकवून मारलं. त्याप्रमाणे आजच्या चक्रव्यूहातही सहा जण काम करत आहेत. हे चक्रव्यूह नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी नियंत्रित करत आहेत, असं राहुल म्हणाले.
राहुल यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही सभागृहाबाहेरील सदस्यांची नावे घेतल्याने नाराजी व्यक्त केली.
21व्या शतकाचतील चक्रव्यूहाच्या मागे तीन शक्ती कार्यरत आहेत, एक म्हणजे, भांडवलदारांची एकाधिकारशाही, दुसरी म्हणजे, देशातील तपास यंत्रणा आणि तिसरी म्हणजे राजकारण शक्ती. आज संपूर्ण देशाची संपत्ती फक्त दोन-तीन लोकांच्या हातात आहे, देशातील तपास यंत्रणांचा वापर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे, अशी टीकाही राहुल गांधींनी केली.