फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी सगळे पुरावे द्यावेत; फडणवीस-देशमुख वादात पटोलेंची उडी

फडणवीसांमध्ये दम असेल तर त्यांनी सगळे पुरावे द्यावेत; फडणवीस-देशमुख वादात पटोलेंची उडी

Nana Patole : माजी गृहमंत्री अनिल देशमु (Anil Deshmukh) आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलीच जुंपली. ईडीची कारवाई टाळण्यासाठी फडणवीसांनी आपल्याला प्रस्ताव दिल्याचा दावा देशमुखांनी केला होता. तसेच आपल्याकडे यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप असल्याचा दावाही त्यांनी केला. तर देशमुखांनी क्लिप जाहीर कराव्यातच, माझ्याकडेही क्लिप्स आहेत, असा इशारा फडणवीसांनी दिला. या आरोप-प्रत्यारोपांवर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) भाष्य केलं.

मनू भाकर पुन्हा करणार ‘करिश्मा’, भारताला मिळणार आणखी एक पदक, जाणून घ्या कसं? 

नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, दोनदिवसा आधी फडणवीस माझ्याकडे पुरावे आहेत, असं म्हणाले. खरंतर फडणवीस साडेसात वर्ष गृहमंत्री पद अनुभवत आहेत. जर काही पुरावे असतील तर लपवून का ठेवले?, असा सवाल त्यांनी केला.

Video : सीतारामन पहिल्या हसल्या मग डोक्याला हात लावला; लोकसभेत नेमकं काय घडलं? 

विरोधकांना धमाकवण्याचं देवेंद्र फडणवीस करत आहेत. अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येताच, त्यांनी सांगितले होतं की, माझ्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात कारवाई करा. कारवाई केल्यानंतरच आम्ही तुम्हाला सोडतो, असा दबाव होतो. हे आरोप झाले तेव्हा फडणवीस बोलले नाही. पण आता दबावतंत्र निर्माण केलं जातं आहे. फडणवीसांमध्ये दम असेल तर मग त्यांनी सगळे पुरावे द्यावेत, देशमुखांनी केलेले आरोप हे खरे आहेत की, खोटे हे राज्यातील जनतेला समजण्याचा अधिकार आहे, त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुतता समोर ठेवावी, असे नाना पटोले यांनी म्हटले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये जे सत्ता नाट्य झालं, ते महाराष्ट्रच्या संस्कृतीला न पटणारं आहे. त्यात सौ. फडणवीस यांनी उल्लेख केला की फडणवीस वेश बदलून जात होते. महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी भाजपने जे काही सूरु केलं, त्याला आता जनता माफ करणार नाही, असंही पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube