Share Market Today Update : आज देशांतर्गत शेअर बाजाराची (Stock Market) सुरुवात घसरणीने झाली. प्री-ओपनिंगमध्ये, सेन्सेक्स 180 अंकांची घसरण दर्शवत होता आणि निफ्टी 50 अंकांची घसरण दर्शवत होता. सेन्सेक्स 200 अंकांनी (Share Market) घसरला आणि 81,600 वर उघडला.
निफ्टी 50 अंकांच्या घसरणीसह 25,000 च्या वर व्यवहार करत होता. बँक निफ्टीही 150 अंकांच्या घसरणीसह 51770 च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किंचित घसरणीसह लाल रंगात उघडले. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण दिसून आली. परंतु, BPCL, HPCL, HAL सारख्या PSU शेअर्सनी चांगली वाढ नोंदवली.
तो ट्रेलर होता! खरा सिनेमा २० तारखेच्या आधी दिसेल; शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांचा मुश्रीफांवर वार
आज निफ्टीमध्ये एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, बीपीसीएल, बीईएल आणि ॲक्सिस बँक यांच्यात चांगली वाढ दिसून आली. तर ट्रेंट, नेस्ले इंडिया, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक या कंपन्यांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. आज बजाज ऑटोचे निकाल येतील. L&T Tech आणि Mphasis च्या निकालांवर फ्युचर्स मार्केटमध्ये लक्ष ठेवलं जाईल.
आज सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी केवळ 12 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. तर उर्वरित 18 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात तर 24 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते.