Stock Market: शेअर बाजाराची चांगली सुरुवात; सेन्सेक्स 270 अंकांनी वधारला, तर निफ्टीही 25,200 च्या पुढं

  • Written By: Published:
Stock Market: शेअर बाजाराची चांगली सुरुवात; सेन्सेक्स 270 अंकांनी वधारला, तर निफ्टीही 25,200 च्या पुढं

Share Market Today : आज देशांतर्गत शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. (Share Market )  सुमारे 300 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 82,251 च्या पातळीवर उघडला. निफ्टी जवळपास 80 अंकांच्या वाढीसह 25,200 च्या पातळीवर उघडला.

Moral code of conduct: आचारसंहिता म्हणजे नक्की काय विषय; वाचा एका क्लिकवर नियम अन् अटी

बँक निफ्टी 140 अंकांच्या वाढीसह 51,975 च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही चांगली वाढ झाली. मिडकॅपमध्ये सुमारे 140 अंकांची वाढ झाली. त्याचवेळी, स्मॉल कॅपने 100 हून अधिक अंकांची झेप घेतली होती.

देशातील सर्वात मोठा IPO आज उघडणार

Hyundai Motor India च्या IPO चा प्राइस बँड 1865 रुपये ते 1960 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. Hyundai Motor India IPO चा GMP कालपर्यंत 75 रुपये होता. दरम्यान, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स यांसारख्या समभागांची नावे सर्वाधिक लाभदायक म्हणून पाहिली जातात. यासोबतच जर आपण घसरलेल्या समभागांवर नजर टाकली तर टाटा स्टील, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले आणि मारुती यांचे शेअर्स घसरताना दिसत आहेत.

शेअर घसरण

शेअर बाजारात आज सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअर्स वधारत आहेत आणि 17 शेअर्स घसरत आहेत, तर NSE निफ्टीच्या 50 पैकी 33 शेअर्स वाढत आहेत आणि 17 शेअर्समध्ये घसरण होत आहे. बीएसईचे मार्केट कॅप 464.44 लाख कोटी रुपयांवर आले आहे आणि 3276 शेअर्समध्ये व्यापार होताना दिसत आहे, त्यापैकी 1895 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. 1252 शेअर्समध्ये घसरण झाली असून 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube