Share Market : भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात; आयटी शेअर्स मोठ्या प्रमामत कोसळले

Share Market : भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात; आयटी शेअर्स मोठ्या प्रमामत कोसळले

Indian stock market : भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात झाली. (stock market) सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह उघडले होते. मात्र, बाजारात लगेचच नफा-बुकिंग झाली आणि निर्देशांक लाल रंगात आले. सेन्सेक्स 112 अंकांच्या वाढीसह 81,000 च्या वर उघडला. पण नंतर तो घसरला.

Instant Loan Apps : च्या माध्यमातून कर्जदारांची पिळवणूक; ईडी’कडून अनेक संस्थांवर मोठी कारवाई

याच दरम्यान, निफ्टी देखील 60 अंकांच्या वाढीसह उघडला, नंतर तो 24,800 च्या खाली आला. बँक निफ्टीही 50,911च्या आसपास लाल रंगात होता. अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे आयटी शेअर्स घसरले आहेत. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींवर झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी शेअर्ससह बहुतांश मोठे शेअर्स घसरले आहेत.

अमेरिकन बाजारात घसरण झाली. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 0.43 टक्क्यांनी घसरला. त्याचप्रमाणे, S&P 500 मध्ये 0.89 टक्के आणि Nasdaq कंपोझिट इंडेक्समध्ये 1.67 टक्क्यांची मोठी घसरण झाली. आशियाई बाजार आज संमिश्र व्यवहार करत आहेत. जपानचा निक्केई 0.2 टक्क्यांनी वर आहे, तर टॉपिक्स 0.32 टक्क्यांनी वर आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

सुरुवातीच्या व्यवहारात, 9 शेअर्स वगळता सेन्सेक्सचे सर्व प्रमुख शेअर्स घसरले. दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक 0.76 टक्क्यांनी घसरले आहेत. टेक महिंद्रा 0.42 टक्क्यांनी आणि टीसीएस 0.29 टक्क्यांनी घसरले. एनटीपीसी, एशियन पेंट्स, टाटा स्टील या शेअर्समध्येही घसरण झाली. दुसरीकडे, टाटा मोटर्स 1 टक्क्यांहून अधिक तेजीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा सर्वात मोठा शेअर सुमारे 1 टक्क्यांनी वाढला.

Video :कौन बनेगा करोडपती मधील स्पर्धकाचा  आजार समजताच अमिताभ बच्चन झाले भावूक

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

22 ऑगस्ट 2024 रोजी BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,60,52,462.97 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 23 ऑगस्ट 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,61,25,377.36 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 72,914.39 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज BSE वर 2892 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1718 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 1039 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 135 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 141 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 5 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. 127 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 30 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube